Full Width(True/False)

Video- लस टोचून घेताना अंकिता लोखंडेने केला देवाचा धावा

मुंबई : अभिनेत्री सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने शेअर करत असते. तिच्या या फोटो आणिव्हिडिओंवर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत असतात. अंकिताने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करोनाची लस घेतानाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती इंजेक्शन घेताना प्रचंड घाबरलेली दिसत असून ती देवाचा धावा करताना दिसत आहे. अंकिताने करोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहताना हसू आवरत नाही. कारण इंजेक्शन घेताना ती खूपच घाबरली होती. तिला घाबरलेलं पाहून इंजेक्शन देणाऱ्या नर्सने तिला काही सूचना दिल्या. मात्र त्यानंतरही अंकिताची भीती काही कमी झाली नव्हती. तिची भीती घालवण्यासाठी नर्सने तिला दीर्घ श्वास घेण्यास सांगितले. त्यानुसार तिने दीर्घ श्वास घेतला. परंतु ती खूपच घाबरलेली होती. अंकिताच्या आईनेही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. अखेर अंकिताच्या आईने तिला देवाचं नाव घेण्यास सांगितलं. तसंच स्वामींचं नाव घेत लस टोचून घे असंही तिची आई म्हणाली. यानंतर जेव्हा नर्स अंकिताला इंजेक्शन देत होती तेव्हा अंकिता 'बापरे.. स्वामी...स्वामी.. स्वामी' म्हणत समर्थांचा धावा सुरू केला. लस घेतल्यानंतर मात्र अंकिताच्या जीवात जीव आला आणि ती हसू लागली. लस दिल्यानंतर काही तास काळजी घेण्यास अंकिताला नर्सने सांगितले. त्यावर अंकिताने तिला 'मला ताप येईल का?' अशी शंका विचारली. त्यावर नर्सने तिला औषधे घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान, हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत अंकिताने त्यासोबत एक नोट लिहिली आहे. तिने लिहिले की, 'मी माझी लस घेतली, तुम्ही देखील तुमची लस शक्य तेवढ्या लवकर घ्या.' अंकिताचा हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री रश्मी देसाईला हसू आवरणे कठीण झाले. रश्मीने कमेंट बॉक्समध्ये हसणारे स्माईली पोस्ट केले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o0dxrO