Full Width(True/False)

५० हजार कॉल आणि दिवसाचे २२ तास काम, इथे वाचा सोनूचा दिनक्रम

मुंबई : करोनाच्या संकटामध्ये अभिनेता गरजू लोकांसाठी देवदूत ठरला आहे. संपूर्ण देशातील गरजू लोकांना सोनू आणि त्याचे सहकारी मदत करत आहेत. गेल्यावर्षी पासून सुरू झालेला मदत कार्याचा हा ओघ या वर्षीही कायम आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने त्याला हे काम करताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केले आहे तसेच त्याच्या आगामी योजनांबद्दलही मोकळेपणाने बोलला आहे. कसे होते मदतकार्य? मदतकार्य कसे केले जाते असा प्रश्न विचारला असता सोनूने सांगितले, 'सरकारही त्यांच्यापरीने सर्वांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु एकाचवेळी सगळ्यांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आपल्यातील प्रत्येकाने शक्य होईल तितकी मदत करायला हवी. कारण गरजू लोकांना वेळत मदत पोहोचवणे अतिशय गरजेचे आहे. हे सर्व आम्ही कसे करतो हे आमचे आम्हालाही माहिती नाही. मी दिवसाचे जवळपास २२ तास फोनवर असतो. आम्हाला दिवसभरातून ४० ते ५० हजार मदतीसाठी फोन येतात.' 'माझी १० लोकांची टीम फक्त रेमेडिसीवीरसाठी फिरत असतात. एक टीम बेडसाठी फिरत असते. प्रत्येक शहरानुसार हे काम सुरू असते. देशातील अनेक डॉक्टरांशी मी बोलत असतो. ज्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी तातडीने पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. ज्या लोकांन आम्ही आधी मदत केली आहे, ते आमच्या या मदकार्यात स्वतःहून सहभागी होत असल्यामुळे मदत करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.' अनेकजण सोनूचे आभार मानत आहेत या कठीण प्रसंगामध्ये स्वतःचे मन कसे शांत राखता असा प्रश्न सोनूला विचारला त्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, ' एका मुलीला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी बेड मिळावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतहोतो. परंतु कुठेच बेड उपलब्ध होत नव्हता. रात्रीचा १ वाजला होता आणि त्या मुलीची बहिण फोनवर रडत होती आणि तिला वाचवण्याची विनंती करत होती. मी तेव्हा खूपच टेन्शनमध्ये आलो होतो. असे करता करता रात्रीचे २.३० वाजले होते मी देवाकडे प्रार्थना करत होतो की उद्या सकाळपर्यंत त्या मुलीला बेड मिळेपर्यंत तिला तू वाचव. अखेर सकाळी ६ वाजता मला बेड उपलब्ध होत असल्याचा कॉल आला आणि त्या मुलीला बेड मिळाला. आता ती मुलगी ठीक आहे. मला यातून खूप समाधान मिळाले आहे.' केवळ इतकेच नाही तर सध्याच्या काळात नकारात्मक विचार आणि रागवत बसायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. या काळात लोकांनीही न चिडता आपले लक्ष लोकांना मदत कशी करता येईल, यावर द्यायला हवे. या अडचणी येतात कामात येणाऱ्या अडचणींबद्दल विचारले असता सोनूने सांगितले, ' जास्त अडचणी या नवीन शहरात काम करताना येतात. तेव्हा तिथे तुमचा कोणताही संपर्क नसतो. अशावेळी तिथल्या लोकांना आमच्याशी जोडून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अनेकदा लहान गावात जाण्याचे साधन नसते तेव्हा आम्ही आमच्या गाड्या घेऊन तिथे जातो आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेतो. हॉस्पिटलची अवस्थाही फार वाईट असते तेव्हा अडचणी अधिक वाढतात.' लोकांना वाचावायचे असेल तर समुद्रात उडी घ्यावीच लागेल काम करताना अनेकदा असे काही व्हिडिओ, फोटो येतात की त्यामुळे मन काही क्षणांसाठी विचलीत होते. त्याबाबत सोनूने एका किस्सा सांगितला, 'देहरादूनमध्ये सबा नावाची एक मुलगी होती. ती सहा महिन्यांची गर्भवती होती आणि तिला जुळे होणार होते. सबा खूपच अडचणीत होती. तिच्या नवऱ्याने आणि बहिणीने ट्विटरच्या माध्यमातून आमच्याकडे मदत मागितली. तेव्हा आम्ही तिच्यासाठी बेड उपलब्ध करून दिला. तिला आयसीयूची आवश्यकता होती, ती उपलब्ध करून दिले. तिला प्लाझ्माची गरज होती ते दिले. मग वेन्टिलेटर दिले. आता ती बरी होणार आणि तिची मुलेही बरी होतील असा विश्वास आम्हाला होता. काही दिवसांनी ती बरी ही झाली. आम्हाला समाधान वाटले. परंतु थोड्या दिवसांनी आम्हाला फोन आला की ती वारली. तेव्हा खूप दुःख झाले. जणू कुणी माझ्या घरातील सदस्यच गेला अशी भावना माझ्या मनात आली.' सोनूने पुढे सांगितले, 'तुमचा विश्वास बसणार नाही पण तिला जाऊन १० तासही झाले नसतील तोच तिच्या नवऱ्याने आणि बहिणीने आम्हाला फोन केला आणि आमच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. हे काम करून इतरांचा जीव वाचवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. काम करण्याची इच्छा हवी. मग तुम्ही गरीब आहात की श्रीमंत याने काहीच फरक पडत नाही.' झाला होता सोनू सुदला स्वतःलाही करोना झाला होता. परंतु त्या काळातही त्याने मदत कायम ठेवली होती. घरात स्वतः क्वारन्टाइन करून घेत त्याने काम केले होते. त्या काळात जास्तीत जास्त लोकांना मदत करता आल्याचे त्याने सांगितले. अनेकांनी याकाळात आराम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु लोकांना मदत करणे हाच माझा आराम होता. आपल्या संपर्काचा वापर करून लोकांना मदत होत असेल तर ते प्रत्येकाने करायला हवे, असे आवाहनही सोनूने यावेळी केले आहे. आगामी योजना सोनूला त्याच्या आगामी योजनांबद्दल विचारले असता त्याने सांगितले, 'मला देशासाठीच काम करायचे आहे. अनेक मुले आजही शिक्षणापासून लांब आहेत. पालक नसल्याने ते शिक्षण घेऊ शकत नाही. त्यातच करोनामुळे आई-वडील गमावणाऱ्या मुलांचे तर अतोनात हाल होत आहेत. अशा मुलांसाठी मी आता यापुढे काम करणारआहे. या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही योजना आखत आहे. त्यामुळे त्यांना मोफत शिक्षण मिळू शकेल. अर्थात हे करण्यासाठी काही वेळ लागणार आहे. कारण सध्या करोनाशी सुरू असलेल्या युद्धामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bbxLKg