नवी दिल्ली : जगभरात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृ दिवस अर्थात साजरा केला जातो. हा दिवस साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने खास पॅक आणले आहेत. या स्टिकर पॅकला Mama Love असे नाव देण्यात आले असून, हे यूजर्सला व्हॉट्सअॅपवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. गेल्या काही दिवसात स्टिकर्स शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. अनेक थर्ड-पार्टी अॅप्स देखील व्हॉट्सअॅप यूजर्सला स्टिकर ऑफर करतात. स्टिकरची लोकप्रियता पाहता आता कंपनीनेच स्वतः थिमवर आधारित स्टिकर्स आणण्यास सुरुवात केली आहे. वाचाः कंपनीने मदर्स डे निमित्त आणलेल्या स्टिकर्सचे ट्विटरवर माहिती दिली. 'हा आठवडा (प्रत्येक आठवडा) आपण आईसाठी साजरा करत असतो. प्रत्येक छोट्या-मोठ्या क्षणांची आपण आपण आठवण काढतो. प्रत्येक आईला मदर्स डे च्या शुभेच्छा', असे व्हॉट्सअॅपने ट्विटमध्ये म्हटले आहे. सोबतच https:// .com/stickerpack/MothersDay/ ही लिंक देखील स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी शेअर केली आहे. ट्विटमधील लिंकवर क्लिक करुन यूजर हे स्टिकर्स डाउनलोड करू शकतात. यासाठी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरवर व्हॉट्सअॅप डाउनलोड असणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने कोविड-१९ थिमवर आधारित Vaccine for all या नावाने स्टिकर आणले होते. हे स्टिकर आणताना कंपनीने म्हटले होते की, या स्टिकर पॅकचा उद्देश कोविड १९ लसीकरणाद्वारे मनोरंजन, हटके पद्धतीने लोकांशी जोडले जाणे, आनंद व्यक्त करणे, दिलासा आणि आशा मिळते हे दर्शवण्यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे हे देखील आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bbXphO