नवी दिल्लीः डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलेपमेंट ऑर्गनायझेशन () आणि सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड रोबोटिक्स (CAIR) ने Covid-19 चे संसर्ग असलेल्या रुग्णांसंबंधी एक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) अल्गोरिदमला डेव्हलप केले आहे. यात छातीच्या एक्सरे वरून कळू शकणार की, व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. वाचाः या डेव्हलपर्सच्या माहिनुसार, या टूलचे नाव Atman AI ठेवले आहे. याचा वापर चेस्ट एक्स रे स्क्रिनिंगसाठी केला जाणार आहे. यात ९६.७३ टक्के अॅक्यूरेसी रेट मिळाला आहे. CAIR, DRDO चे डायरेक्टर डॉक्टर यू. के. सिंह यांनी सांगितले की, या डायग्नोस्टिक स्टूलला डेव्हलप करणे हे डीआरडीओच्या प्रयत्नाचा एक भाग होता. याचा मुख्य उद्देश डॉक्टर, आणि फ्रंट लाइन वर्कर्सची मदत करणे हा होता. रुग्ण पॉझिटिव्ही आहे की निगेटिव्ह हे कळल्यावर डॉक्टर त्याच्यावर लवकर उपचार करू शकतील. करोना व्हायरससाठी लिमिटेड टेस्टिंग फॅसिलिटीज मिळाल्यामुळे एआय टूलला डेव्हलप करणे गरजेचे होते. हे टूल सेकंदात रेडियोलॉजिकल फायंडिंग्सला ऑटोमॅटिकली डिटेक्ट करून कोविडची माहिती मिळण्यास मदत करू शकेल. वाचाः टेस्ट करण्यात कमी खर्च या टूलवर काम करणाऱ्या टीमने सांगितले की, एक्स रेचा वापर करून कोविड १९ संबंधी माहिती मिळू शकते. यासाठी कमी खर्च येऊ शकतो. डेव्हलपर्सने सांगितले की, सिटी स्कॅनचा यात वापर केला जात असल्याने देशातील छोट्या शहरात सुद्धा याचा वापर करता येऊ शकणार आहे. त्यामळे रेडियोलॉजिस्टवर येणारा दबाव सुद्धा कमी होईल. कोविड १९ रुग्णांसाठी जास्त वापर सीटी स्कॅन मशीनचा केला जाऊ शकेल. वाचाः डेव्हलपर्सने हेही सांगितले की, या टूलला डेव्हलप करण्यासाठी RT-PCR पॉझिटिव्ही रुग्णाचा चेस्टचा एक्स रेचा वापर केला जाणार आहे. या आजाराला वेगवेगळ्या स्टेजवर टेस्ट केले गेले आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले की, HCG एकेडमिक्सच्या मदतीने भारतात रेडियोलॉजिस्टचे सर्वात मोठे डिजिटल नेटवर्क 5C नेटवर्क कडून याचा वापर केला जाऊ शकतो. देशातील १ हजार हॉस्पिटल्स मध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w4hGy7