नवी दिल्लीः रेडमी नोट सीरीज, शाओमी (Xiaomi)ची सर्वात पॉप्यूलर सीरीज पैकी एक आहे. शाओमीने नुकतीच लाँच केलेली Redmi Note 10 सीरीजने १ जून पासून सुरू झालेल्या सेलमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. शाओमीने सांगितले की, फक्त ९ दिवसांत Redmi Note 10 सीरीजच्या स्मार्टफोन्सची विक्री १० लाख यूनिट्स झाली आहे. चीनमध्ये रेडमी नोट १० सीरीजच्या स्मार्टफोन्सचा सेल १ जून पासून सुरू करण्यात आला होता. वाचाः या सेलच्या पहिल्याच तासात ५ लाखाहून जास्त फोनची विक्री झाल्याचे शाओमीने सांगितले. बाकीच्या दिवसात ५ लाख स्मार्टफोनची विक्री झाली आहे. शाओमीच्या Redmi Note 9 Series ला १० लाख युनिट्च्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी १३ दिवसांचा वेळ लागला होता. शाओमीने चीनमध्ये या सीरीज अंतर्गत Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन लाँच केले आहे. हे दोन्ही फोन 5G कनेक्टिविटी सोबत येतात. वाचाः स्मार्टफोनचे फीचर्स Redmi Note 10 स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल फुल HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. शाओमी रेडमी नोट 10 स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरने पावर्ड आहे. तर Redmi Note 10 Pro स्मार्टफोन मध्ये ६.६ इंचाचा एलसीडी पॅनेल दिला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1100 चिपसेट सोबत येतो. वाचाः रेडमी नोट १० प्रोच्या बॅक मध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा Redmi Note 10 स्मार्टफोनच्या बॅकमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक मध्ये मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. फोनच्या फ्रंट मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Redmi Note 10 Pro स्मार्टफोनच्या बऍक मध्ये मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, फोनच्या बॅकमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pGTKi9