Full Width(True/False)

शाओमी, रियलमीला टक्कर देण्यासाठी भारतात नोकियाचा पहिला 5G स्मार्टफोन येतोय

नवी दिल्ली : सॅमसंग, , आणि अन्य 5G फोनला टक्कर देण्यासाठी लवकरच भारतात एक शानदार ५जी स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनला कंपनीने नाव दिले आहे. याआधी यूरोप आणि अन्य काही बाजारात यावर्षाच्या सुरुवातीला लाँच झाला आहे. आता ग्लोबल भारतात स्मार्टफोन पोर्टफोलियोचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. कंपनी लवकरच ५जी सेगमेंटमध्ये Nokia X20 आणि ला लाँच करू शकते. सध्या कंपनीचा कोणताच ५जी फोन भारतात नाही. वाचाः Nokia X20 आणि X10 दोन्ही फोनला SAR वॅल्यू सेक्शन अंतर्गत Nokia India च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. या लिस्टिंगमध्ये Nokia G20, Nokia G10, Nokia C20 आणि Nokia C10 फोनचा उल्लेख आहे. या फोन्सला वेबसाइटवर लिस्ट केल्याने HMD लवकरच भारतात लाँच करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीने अद्याप फोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिलेली नाही. तसेच, भारतात कंपनीचा रेकॉर्ड बघितले तर एका फोननंतर दुसऱ्या फोनला लाँच करण्यास अधिक वेळ घेतल्याचे पाहायला मिळते. वाचाः Nokia X20 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स काही दिवसांपूर्वी हा फोन गीकबेंच लिस्टिंगवर देखील लिस्ट झाला होता. यावरून हा फोन ६ जीबी रॅम आणि अँड्राइड ११ सोबत येणार असल्याची माहिती मिळाली होती. एका रिपोर्टनुसार, फोनचे ८ जीबी रॅम व्हेरिएंट देखील येऊ शकते. या व्यतिरिक्त यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० ५जी प्रोसेसर आणि ६४ जीबी/१२८ जीबी स्टोरेज पर्याय मिळेल. रिपोर्टनुसार, Nokia X20 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सल डेप्थ आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा असेल. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यात ४५०० एमएएचची बॅटरी मिळू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qoyIW4