Full Width(True/False)

Windows 11चे लॉंचिंग आज, बदलणार लॅपटॉप-कम्प्युटर वापरण्याची स्टाईल, येथे पाहा व्हर्च्युअल इव्हेंट

नवी दिल्ली. मायक्रोसॉफ्टची विंडोज ११ ही विंडोज १० ची २०१५ मध्ये लॉन्च केलेली अपग्रेड आवृत्ती असेल. विंडोज ११ नवीन इंटरफेस आणि अ‍ॅनिमेशन इफेक्टसह येईल. आज मायक्रोसॉफ्ट एक व्हर्चुअल इव्हेंट होस्ट करणार आहे. ज्यात, नेक्स्ट जेनरेशन विंडोज ११ ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली जाऊ शकते. आयएसओ लीक अहवालानुसार विंडोज ११ सर्व नवीन इंटरफेस आणि अ‍ॅनिमेशन इफेक्टसह येईल. नवीन विंडोज ११ मध्ये, अपग्रेड केलेला स्टार्ट मेनू दिला जाईल, जो डीफॉल्टनुसार स्क्रीनच्या तळाशी मध्यभागी असेल. वाचा : अशात लवकरच आपला लॅपटॉप व संगणक चालवण्याची शैली पूर्णपणे बदलू शकते. विंडोज ११ विनामूल्य अपग्रेडसह ऑफर केले जाऊ शकते. म्हणजेच, विंडोज १० असलेले वापरकर्ते विंडोज ११ मध्ये विनामूल्य स्थलांतर करण्यास एनेबल असतील. परंतु, विंडोज ११ च्या तुलनेत विंडोज १० ची निम्न आवृत्ती असलेल्या ऑपरेटिंग सिस्टमला रिप्लेस करण्यासाठी मात्र आपल्याला पैसे द्यावे लागतील. Microsoft ची संभाव्य वैशिष्ट्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज ११ चे नाव अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. परंतु, लॉन्च होण्यापूर्वी विंडोज ११ ची काही वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. त्यानुसार, विंडोज ११ मध्ये एक नवीन ध्वनी, अ‍ॅनिमेशन आणि ट्रान्सझिशन दिसू शकते. तसेच, फोल्डर्स आणि चिन्हांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये, Android आणि iOS वर आधारित इतर ऑपरेटिंग सिस्टम सहज कनेक्ट केले जाऊ शकतात. यामुळे फाईल्स ट्रान्सफर करणे सोप्पे होईल. नवीन ऑपरेटिंग सिस्टममधील स्टार्ट मेनूमधील बदलासह लाईव्ह टायटल्स काढले जाऊ शकतात. टास्कबारमध्ये एक मोठा बदल दिसू शकतो. आयकॉन्सना टास्क बारच्या मध्यभागी ठेवण्यात येऊ शकते. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zM8dxQ