नवी दिल्लीः Amazon चे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस () ने घोषणा केली आहे की, ते आपला भाऊ मार्क सोबत लवकरच अंतराळात जाणार आहे. जेफ बेजोस २० जुलै रोजी आपली रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिन () ने पहिल्यांदा अंतराळात जाणार आहेत. यावेळी त्यांचा छोटा भाऊ मार्क आणि आणखी एक जण त्यांच्यासोबत असणार आहे. वाचाः या अंतराळासाठी तिसरी सीट राखीव करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन बोली लावली जात आहे. १२ जून रोजी ही बोली संपूष्टात येईल. यानंतर हे स्पष्ट होईल की, जेफ यांच्यासोबत अंतराळात तिसरी व्यक्ती कोण असणार आहे. या बोलीसाठी करेंड बीडिंग २,८००,००० डॉलर आहे. हे रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनची पहिली अंतराळातील प्रवास आहे. एएफपीच्या रिपोर्टनुसार, ही अंतराळ यात्रा एकूण १० मिनिट पर्यंत असणार आहे. ज्यात चार मिनिटासाठी कॉर्मन लाइनच्या वर जाईल. कॉर्नन रेखा पृथ्वीच्या वायुमंडल आणि अंतराळ दरम्यान मान्यताप्राप्त सीमा आहे. म्हणजेच ही एक पृथ्वी आणि वायूमंडल आणि बाह्य अंतरिक्ष या दरम्यानची सीमा बॉर्डर लाइन आहे. वाचाः या उड्डाणला जेफ बेजोसकडून Amazon.com चे सीईओ पद सोडल्याच्या जवळपास दोन आठवड्यानंतर म्हणजेच २० जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. जेफ बेजोस यांनी सोशल मीडियावर आपल्या अंतराळ प्रवासाबद्दल घोषणा करताना लिहिले की, ज्यावेळी मी फक्त ५ वर्षाचा होतो. तेव्हापासून माझे अंतराळचे स्वप्न होते. २० जुलै रोजी मी माझ्या भावासोबत हे स्वप्न साकार करणार आहे आणि हे माझ्या चांगल्या मित्रासोत सर्वात खास क्षण असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fXV9xE