नवी दिल्ली : २०२० चा सर्वात पॉवरफूल OnePlus वनपल्स ८टी च्या किंमतीत पुन्हा एकदा कपात झाली आहे. तुम्ही जर या फोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनची नवीन किंमत काय आहे व याच्या स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊया. वाचाः स्पेसिफिकेशन्स ड्यूल सिम सपोर्टसह येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच फूल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशिया २०:९ आहे. मध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर मिळेल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ४ रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेंस, ५ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेंसर आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा सेंसर मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी यात ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. वाचाः OnePlus 8T ची किंमत 8टी दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या किंमतीत १००० रुपये कपात झाली आहे. कपातीनंतर ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४१,९९९ रुपये आहे. फोन नवीन किंमतीसह Amazon वर उपलब्ध आहे. दरम्यान, याआधी फेब्रुवारी महिन्यात या हँडसेटच्या किंमतीत ३ हजार रुपयांनी कपात झाली होती. कपातीनंतर ८ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ४२,९९९ रुपये होती. गेल्या वर्षी 8T ला ८ जीबी रॅम + १२८ जीबी व्हेरिएंटला ४२,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरिएंटला ४५,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z99UFo