Full Width(True/False)

बहीण सोनमसाठी अर्जुन कपूरने घेतला होता बॉक्सरशी पंगा

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक भावा-बहिणीच्या जोड्या आहेत. त्यातली आणि ही भावा बहिणीची जोडी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ-बहिण असले तरी त्यांच्यात सख्या भावंडांप्रमाणे प्रेम आहे. आपल्या बहिणीसाठी अर्जुनने शाळेत असताना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांशी मारामारी केली होती. या मोठ्या मुलांकडून त्याने मारही खाल्ला होता. ही आठवण अर्जुनने एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. एका शाळेत शिकत होते अर्जुन आणि सोनम अर्जुन आणि सोनम दोघेही आर्य विद्या मंदिर शाळेत शिकले. ते शाळेत एकत्र जायचे आणि यायचे. इतकेच नाही तर हे दोघेजण बॉस्केटबॉलही एकत्रच खेळायचे. खरे तर अर्जुनचा स्वभाव अजिबात भांडखोर नाही, परंतु असे काही झाले की त्यामुळे त्याने थेट हाणामारीच केली. वयाने मोठ्या मुलांबरोबर मारामारी मुलाखतीमध्ये अर्जुनने त्याच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अर्जुनने सांगितले, 'लहान असताना मी खूप जाड होतो. त्यामुळे मी नेहमीच सोनमशीच खेळायचो. त्या दिवशीही आम्ही दोघे बास्केटबॉल खेळत होतो. तेव्हा तिथे आमच्यापेक्षा मोठी मुले तिथे आली आणि त्यांनी सोनमच्या हातातून बॉल हिसकावून घेतला आणि ते तिथे खेळणार असल्याचे सांगितले.' सोनम रडत रडत अर्जुनकडे आली अर्जुनने पुढे सांगितले, 'त्या मुलांनी सोनमकडून बॉल हिसकावून घेतल्यानंतर ती माझ्याकडे रडत रडत आली. तिने त्या मुलांनी काय केले ते सांगितले. ते ऐकून मला खूपच राग आला आणि मी त्या मुलांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्या मुलांनाही राग आला. ते माझ्याकडे रागारागाने पाहू लागले.' अर्जुनने खाल्ला मार अर्जुनने पुढे सांगितले, 'मी त्यांना शिव्या देत असल्याने त्यांना खूप राग आला. त्यातील काही मुलांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी मला इतके मारले की माझा डोळ्याभोवती काळेनिळे झाले होते. तशाच अवस्थेत मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर सोनमने मला सांगितले की मी ज्या मुलाशी मारामारी केली होती तो बॉक्सिंग चॅम्पियन होता.' शाळेतून काही दिवस काढून टाकले अर्जुन पुढे म्हणाला, ' केवळ मारच खाल्ला असे नाही तर मी त्या मुलांना शिव्या दिल्यामुळे मला काही दिवस शाळेतून काढून टाकले होते. या घटनेनंतर मी सोनमला सांगितले की आता यापुढे तूच स्वतःची काळजी घे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SWIbas