Full Width(True/False)

आता १६ कोटींसाठी वाजिद खानच्या पत्नीची सासरच्यांशी लढाई

मुंबई: दिवंगत गीतकार आणि गायक यांची पत्नी कमालरूख खान हिनं आता मुंबई उच्च न्यायालायात धाव घेतली आहे. तिनं आणि त्यांच्या आईच्या विरोधात अनेक आरोप केले असून साजिद खान आणि त्यांच्या आईनं आपल्याला कुटुंबाच्या संपत्तीतून वगळल्याचं तिनं म्हटलं आहे. कमालरुख खाननं मुंबई उच्च न्यायालयात आपल्या अधिकारांची मागणी केली आहे. वाजिद खान यांची पत्नी कमालरुख मागच्या ६ वर्षांपासून कुटुंबापासून वेगळी राहते आणि या आधीही तिनं आपल्या सासरच्यांविरोधात अनेक आरोप केले आहेत. दरम्यान कमालरुख खानच्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयानं साजिद खान आणि त्यांची आई यांना एकूण मालमत्तेचा तपशील मागितला आहे. १६ कोटींच्या एकूण मालमत्तेमध्ये वाजिद खान काही प्रसिद्ध आर्टिस्टच्या पेंटिंगचे मालक होते. ज्याची किंमत कमालरुख खाननं ८ कोटी रुपये असल्याचं म्हटलं आहे. या पेटिंगमध्ये एमएफ हुसैन यांची अनेक पेंटिंग आणि स्केचेस आहे. याशिवाय तैय्यब मेहता, वीएस गायतोंडे, एसएच रजा यांची प्रत्येकी एक तर जे स्‍वामीनाथ यांची दोन पेंटिंग आहे. दरम्यान कमालरुख खानचं या पेंटिंगशी काही खास भावनिक कनेक्शन होतं का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर तिचे वकील बहरैज ईरानी यांनी सांगितलं की, 'कुटुंबासाठी या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ज्यात भावनिक आणि आर्थिक महत्त्व आहे. आज कमालरुख विधवा आहे आणि आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती याच सर्व गोष्टींवर अवलंबून आहे. एवढंच नाही तर आपल्या मुलीचं शिक्षण अमेरिकेत व्हावं अशी वाजिद खान यांची इच्छा होती. पण त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय यासाठी मदत करण्यास तयार नाहीत त्यामुळे यांच्यासाठी हा पैसा महत्त्वाचा आहे.' ईराणी यांच्या म्हणण्यानुसार, 'पती-पत्नीमध्ये कितीही वाद असला तरीही मुलांना घटस्फोट दिला जात नाहीय किंवा पती-पत्नीच्या घटस्फोटाने मुलांच्या अधिकारांवर काहीच फरक पडत नाही. कारण वडिलांच्या संपतीवर त्यांचा अधिकार असतोच.' वाजिद खान यांनी निधनापूर्वी कमालरुखपासून घटस्फोट घेण्यासाठी केस फाइल केली होती. पण त्यांच्या निधनापूर्वी हे होऊ शकलं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wYpzpb