Full Width(True/False)

अग्गंबाई! तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्कीच्या खास नात्याची जोरात चर्चा

मुंबई: '' या मालिकेत शुभ्रा आणि सोहम यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती. शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री आणि सोहम अर्थात म्हणजे अभिनेता यांच्या पडद्यामागच्या मैत्रिचीही जोरात चर्चा सुरू होती. मालिका बंद झाल्यानंतरही दोघांमधील संपली नसल्याचं नुकतंच समोर आलं आहे. नुकताच तेजश्रीनं तिचा वाढदिवस साजरा केला. तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त मित्र-मैत्रिणींनी , चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. असं असलं तरी एका पोस्टची मात्र, जबरदस्त चर्चा सुरू आहे. ही पोस्ट आहे अभिनेता आशुतोष पत्की याची . या पोस्टमध्ये आशुतोषनं तेजश्रीबद्दलच्या भावना खास शब्दांत व्यक्त केल्या आहेत. काय आहे आशुतोषची पोस्ट?माझ्या खास मैत्रिणी, तुला हे सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. ते माझ्यासाठी खूप खास आहे. तू मला आतापर्यंत प्रोत्साहन दिलंस त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. तू होतीस म्हणून मी चांगला माणूसचं नाही तर चांगला अभिनेताही बनू शकलो. तुझ्या वाढदिवासानिमित्त दोन गोष्टी सांगेन, पहिली म्हणजे भूतकाळ विसरून जा...कारण आपण तो बदलू शकत नाही. आणि दुसरी म्हणजे (प्रजेंट) गिफ्ट विसर...जे मी तुला आणलं नाहीए',अशी खास पोस्ट आशुतोषनं लिहिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3peEQzx