नवी दिल्ली. सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्वाचे सरकारी कागदपत्र बनले आहे. नवीन नोकरी मिळण्यापासून नवीन सिमकार्ड मिळण्यापर्यंत आणि घर मिळण्यापर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आधार कार्डशिवाय काहीच करता येत नाही अशात, आधार कार्डचा जास्त वापर केल्यामुळे त्याचा गैरवापर होण्याचा धोका देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत तुमचे आधार कार्ड वापरले गेले आहे हे नेहमी तपासात राहणे आवश्यक आहे. तुमच्या परवानगीशिवाय आधार कार्डचा गैरवापर करीत आहे असे वाटत असल्यास आपण तक्रार करावी. जाणून घ्या डिटेल्स. वाचा : आधार कार्ड वापरले गेले आहे हे 'असे' तपासावे
  • यूआयडीएआय च्या अधिकृत साइटवर क्लिक करा https://ift.tt/2khMdZs
  • वेबसाइटच्या डाव्या बाजूला 'माय आधार' या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला 'आधार सर्व्हिसेस' ला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन इतिहासावर क्लिक करा.
  • त्यानंतर १२ अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल.
  • यानंतर ऑथेंटिकेशनसाठी 'सेंट ओटीपी' वर क्लिक करा.
  • ओटीटी भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर, आपल्या आधार कार्डच्या वापराची नोंद आपल्या समोर असेल.
तक्रार कशी करावी एखाद्याने आपल्या आधार कार्डाचा गैरवापर केल्याचे आपल्याला वाटत असल्यास आपल्याला त्वरित तक्रार दाखल करावी लागेल. टोल फ्री नंबर १९४७ वर कॉल करून किंवा help@uidai.gov.in वर ईमेल करून तक्रारी नोंदवता येतील. https://ift.tt/2UtdCI6 लिंकवर ऑनलाईन तक्रार देखील दाखल करू शकता. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Tip5M4