Full Width(True/False)

पक्षप्रवेश! वैशाली माडेनं घातलं राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ

मुंबई : महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका हिने आता राजकारणात प्रवेश केला आहे. वैशालीने पक्षात आज प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी वैशालीचे स्वागत केले. यावेळी पक्षातील काही ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला. वैशालीला विदर्भाचे विभागीय अध्यक्षपद देण्यात आले आहे. दरम्यान, ३१ मे रोजीच वैशालीचा पक्षप्रवेश होणार होता. स्वतः खासदार सुप्रिया सुळेंसह इतर जेष्ठ नेते उपस्थित राहणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मात्र आज ३ जून रोजी वैशालीचा पक्षप्रवेश झाला. कोण आहे वैशाली माडे?वैशाली ही शेतकरी कुटुंबातून आली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांतील सिनेमांमध्ये तिनं पार्श्वगायन केलंय. 'भारतरत्न' लता मंगेशकर व आशा भोसले यांची ती जबरदस्त फॅन आहे. 'बाजीराव मस्तानी' या हिंदी सिनेमातील 'पिंगा' हे तिनं गायलेलं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. तसंच तिनं 'कलंक' या हिंदी सिनेमातील 'घर मोरे परदेसिया' हे गाणं गायलंय. मराठी सिनेमातही तिनं अनेक गाणी गायली आहेत. 'सारेगमप' या स्पर्धेची विजेती ठरल्यानंतर वैशालीला हिंदी सारेगमप या शोसाठी विचारणा झाली. पण त्यावेळी वैशाली नऊ महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे अशा परिस्थितीत शोमध्ये सहभागी होणे तिला शक्य नव्हते. तिने वाहिनीजवळ एक महिन्याच्या कालावधी मागितला होता. डिलिव्हरी झाल्यानंतर आठ दिवसांतच वैशाली या शोमध्ये सहभागी झाली. आठ दिवसांच्या मुलीला ग्रीन रुममध्ये ठेऊन वैशाली शोचं शूटिंग करायची. या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसंच वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. वैशालीनं तिच्या गायनाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34JeGLG