म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यात हनी ट्रॅपचा एक प्रकार समोर आला असून, सायबर भामट्यांनी तरुण शेतकऱ्याला ब्लॅकमेल करीत पैशांची मागणी केली. अश्लील व्हिडीओ बनवून पैशांची मागणी करण्यात आली असून, या प्रकरणी ग्रामीण पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे सहा नागरिकांनी फसवणूक, तसेच पैशांची मागणी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. वाचाः या प्रकरणी ३१ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, सोशल मीडियावर त्याची ओळख एका महिलेसोबत झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक घेत मोबाइलवरून संभाषण सुरू केले. त्यानंतर महिलेने व्हिडीओ कॉलवरून संभाषण करण्यास सांगितले. तक्रारदाराने व्हिडीओ कॉल केला. त्या वेळी समोरील व्यक्तीने अश्लील संवाद साधत तक्रारदार तरुणाला त्याचे कपडे काढण्यास प्रवृत्त केले. तक्रारदाराने कपडे काढल्यानंतर संशयिताने त्यांचा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. तो व्हिडीओ तक्रारदारास पाठवून पाच हजार रुपयांची मागणी केली. बदनामी होईल या भीतीपोटी त्याने सुरुवातीला पाच हजार रुपये दिले. त्यानंतर संशयिताने पुन्हा पैशांची मागणी केल्याने तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेत आपबिती सांगितली. वाचाः पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली आहे. याच दरम्यान फसवणूक झाल्याची अथवा ब्लॅकमेलिंग सुरू असल्याच्या सहा तक्रारी ग्रामीण पोलिसांकडे आल्या आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या तक्रारदारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. व्हिडीओ चॅट करताना समोरील व्यक्ती केसांनी चेहरा झाकतात किंवा अंधारातून पीडित व्यक्तींसोबत संवाद साधतात. शारीरिक आकर्षणापोटी समोरील व्यक्तीवर विश्वास ठेवणे अनेकांना आर्थिक व मानसिक त्रासाचे ठरते. वाचाः काय काळजी घ्यावी - सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा. - एखादी तरुणी, महिला कोणतीही ओळख नसताना आपल्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी. - व्हिडीओ कॉल्स, अश्लील संवाद करूच नये - पैशांची मागणी झाल्यास लागलीच नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहे. यात तरूण सहज बळी पडतात. अनोळखी व्यक्तींसोबत बोलताना सतर्कता बाळगा. फसवणूक झाल्यास पोलिसांकडे तक्रार द्या. तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल. - सचिन पाटील, पोलिस अधीक्षक वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34LRpZD