म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील डीएड, बीएडचे शिक्षण पूर्ण झालेल्या बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी शिक्षा अभियानाच्या नावे बनावट (फेक) वेबसाइट तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या वेबसाइटद्वारे भावी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती प्रक्रिया राबविण्याचा उद्देश समोर आला आहे. या वेबसाइटशी राज्य सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले आहे. वाचाः प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी केंद्र सरकार पुरस्कृत सर्व शिक्षा अभियानातील योजनेची शालेय शिक्षण विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद या संस्थेमार्फत २००२-०३ ते २०१७-१८ या कालावधीत अंमलबजावणी करण्यात येत होती. सद्यस्थितीत केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या एकत्रीकरणातून समग्र शिक्षा योजनेची अंमलबजावणी २०१८पासून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानाची २०१७-१८ पासून अंमलबजावणी सुरू नाही. असे असताना https://ift.tt/3yZNpCJ या संकेतस्थळावर ‘सर्व शिक्षा अभियान रिक्रूटमेंट २०२१’ या मथळ्याने प्राथमिक शिक्षक, कनिष्ठ शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, शिपाईपदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर या वेबसाइटशी आणि त्याद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेशी राज्य सरकार, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि समग्र शिक्षा योजनेचा संबंध नसल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक राहुल द्विवेदी यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. वाचाः राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, भरती प्रक्रियेबाबत न्यायालयीन याचिका दाखल आहेत. त्यासोबतच आरक्षणासारख्या कारणांमुळे भरती प्रक्रिया गतीने सुरू आहे. या परिस्थितीचा फायदा घेत, काही व्यक्तींनी बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही फेक वेबसाइट तयार केल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TFdwia