मुंबई : टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता गेल्या ३६ दिवसांपासून शी लढा देत आहे. आजही त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, अनिरुद्धची तब्येत आधीपेक्षा सुधारली असून त्याला आयसीयूमधून बाहेर आणले असले त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर अनिरुद्धने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली. त्याने हॉस्पिटमधील फोटो पोस्ट करत लिहिले की, ' ३६ व्या दिवशीही लढाई सुरूच आहे...' त्याने पुढे लिहिले आहे, 'अजूनही ऑक्सिजन सुरू आहे. आता फुफ्फुसांमधील संसर्ग कमी झाला आहे. डॉ. गोयंकाने सांगितले आहे, की जास्त बोलू नको. परंतु उत्तरे देऊ शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियजनांशी आणि चाहत्यांशी मी संवाद साधू शकतो. सिनेमे, कार्यक्रम पाहू शकतो. नवीन आयुष्य मिळाले आहे. जणू काही माझा नवीन जन्मच झाला आहे. आता सगळ्यांबरोबर चालू शकणार आहे. या गोष्टीवर एक सेल्फी तर काढायलाच हवा ना! तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो.’ काही दिवसांपूर्वी आयसीयूमधून बाहेर अनिरुद्धने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर त्याने बरे व्हावे आणि संपूर्ण बरे झाल्यानंतरच कामाला सुरुवात करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. अनिरुद्ध आता आयसीयूमधून बाहेर आला असला तरी अद्याप तो ऑक्सिजनवरच आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ' गेल्या २२ दिवसांपासून हॉस्पिटलच्या बेडवर पडून आहे. याकाळात तुम्ही सर्वांनी मला प्रेम, आशीर्वाद दिले आहेत. तेव्हापासून मी सातत्याने ऑक्सिजनवरच आहे. माझ्यात जी काही हिंमत आली आहे ती तुमच्या आशीर्वादामुळेच. तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत.' '१४ दिवसांनंतर आयसीयूमधून बाहेर आल्यानंतर आता मला थोडे बरे वाटत आहे. फुफ्फुसांना ८५ टक्के संसर्ग झाला होता. त्यामुळे बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे, अर्थात काही घाई नाही. फक्त स्वतःहून माझा मला श्वास घ्यायचा आहे. लवकरच तुम्हा सगळ्यांना भेटायचे आहे. भावुक झाल्यावर मला रडू येते आणि मी नर्व्हस होतो, हे दिवसदेखील निघून जातील. तुम्ही सर्वांनी संपूर्ण जगासाठी देखील प्रार्थना करा. जय परम शक्ती, खूप सारे प्रेम... ' भोपाळमध्ये चित्रीकरण करताना झाला करोनाअनिरुद्धला एप्रिलमध्ये करोनाची लागण झाली होती. त्यावेळी तो एका वेब सीरिजच्या चित्रीकरणासाठी भोपाळला गेला होता. तेव्हाच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याने २३ एप्रिलला करोनाची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याची तब्येत जास्त बिघडली. ऑक्सिजनची पातळीही कमी झाली, फुफ्फुसांतही संसर्ग अनिरुद्धच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागली होती आणि फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होऊ लागले होते. त्यावेळी तो भोपाळमधील एका खासगी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल झाला होता. तेव्हापासूनच त्याच्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू होते. आता त्याची तब्येत सुधारल्याने त्याला आयसीयूच्या बाहेर आणले आहे. मात्र, अद्यापही तो हॉस्पिटलमध्येच असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w4uMLV