Full Width(True/False)

भारताचा पहिला फोल्डेबल लॅपटॉप लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून अवाक व्हाल

नवी दिल्ली : ने फोल्डिंग डिस्प्लेसह येणारा पहिला फ्लॅगशिप Lenovo ला भारतात लाँच केले आहे. थिंकपॅड एक्स१ फोल्डमध्ये मल्टीलिंक टॉर्क हिंज आहे, जे फोल्डिंग डिझाइनला सक्षम बनवते. हा लॅपटॉप दिसायला खूपच आकर्षक आहे. पारंपारिक लॅपटॉपप्रमाणे काम करता यावे यासाठी कंपनीने यासोबत एक ब्लूटूथ मिनी फोल्ड कीबोर्ड देखील सोबत दिला आहे. उघडल्यावर टॅबलेट स्वरूपात देखील काम करतो. डिव्हाइसला बिल्ट-इन किकस्टँडचा उपयोग करून एका टेबलवर ठेवू शकता. हे स्टँड डिस्प्लेला होल्ड करण्यासाठी असते. वाचाः थिंकपॅड X१ फोल्डचे बेसिक स्पेसिफिकेशन
  • लॅपटॉपमध्ये एलजी डिस्प्लेद्वारे बनवण्यात आलेल्या १३.३ इंच २के (२०४८x१५३६ पिक्सल) pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले अनेक काम सहजरित्या करण्यासाठी फोल्ड करता येतो. फोल्डिंग फॉर्म फॅक्टरला सक्षम करण्यासाठी डिस्प्लेमध्ये एक मॅकेनिकल हिंज देण्यात आला आहे.
  • सामान्य लॅपटॉप्रमाणे वापर करण्यासाठी लँडस्केप मोडमध्ये याचा वापर करता येईल. नोटबुक स्वरूपात वापर करण्यासाठी पोर्ट्रेट ओरिएंटेशनवर काम करू शकता. लेनोवा अ‍ॅक्टिव्ह पेनचा उपयोग करून नोट्स लिहू शकता व स्केच देखील काढू शकता.
  • लॅपटॉपला टेबलवर पोर्ट्रेट अथवा लँडस्केप ठेवण्यासाठी सोबत एक स्टँड आणि सोबतच ब्लूटूथ मिनी फोल्ड कीबोर्ड दिला आहे.
  • विंडोज १० प्रोसह चालणाऱ्या या लॅपटॉपमध्ये लेनोवो मोड स्विचर अ‍ॅप प्रीलोडेड आहे, हे अ‍ॅप मशीनला आवश्यकतेनुसार ओरिएंटेशन बदलण्याची परवानगी देते. यूजर्स स्क्रीनला दोन भागात विभागू शकतात अथवा पूर्ण देखील वापर करू शकतात. यासोबतच ब्लूटूथ कनेक्ट नसेल तर आपोआप ऑन-स्क्रीन कीबोर्ड वापरता येतो.
  • सर्वसाधारणपणे फोल्डिंग फोन नाजूक असतात व सहज खराब होतात. मात्र हा लॅपटॉप अतिशय भक्कम व मजबूत आहे. कंपनीचा दावा आहे की लॅपटॉपने MIL-STD 810H सर्टिफिकेशन पास केले आहे.
  • याव्यतिरिक्त कंपनीने सांगितले आहे की, लॅपटॉपचे अतिरिक्त परीक्षण करून पाहण्यात आले आहे. जेणेकरून, हे सुनिश्चित होईल की स्क्रीनला हजारो वेळा उघडले व बंद केले तरी अडथळा येणार नाही.
वाचाः आधुनिक फीचर्ससोबत येतो हा लॅपटॉप
  • थिंकपॅड X१ फोल्ड ११th जनरेशन इंटेल UHD ग्राफिक्स, ८GB LPDDR४x रॅम आणि PCIe-NVMe M.२ २२४१ SSD च्या १TB सोबत Intel Core i5 प्रोसेसरसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय ६, ब्लूटूथ v५.१ आणि दोन यूएसबी टाइप-सी ३.१ जेन 2 पोर्ट (एक डिस्प्लेपोर्ट म्हणून वापरता येईल) देण्यात आले आहे. यात पर्यायी ५जी/४जी एलटी सपोर्ट देखील मिळेल.
  • उत्तम मल्टीमीडिया एक्सपिरियंससाठी लेनोवोने ४ मायक्रोफोन आणि डॉल्बी एटमॉस स्पीकर सिस्टम देण्यात आली आहे. यात विंडोज हॅलो फेशियल रिकॉग्निशन आणि व्हिडीओ चॅटसाठी हायब्रिड इंफ्रारेड (IR) आणि एचडी वेब कॅमेरा मिळेल.
  • थिंकपॅड X१ फोल्ड एकदा चार्ज केल्यानंतर १०.४ तासांपर्यंत व्हिडीओ प्लॅबॅकचा दावा करतो. ५०वॉट रॅपिड चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.
भारतात लेनोवो थिंकपॅड X१ फोल्डची किंमत आणि उपलब्धता
  • या लॅपटॉपची किंमत ३,२९,००० रुपयांपासून सुरू होते. लॅपटॉपला लेनोवो इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल व येथे २,४८,५०८ रुपये किंमतीसह उपलब्ध आहे. दोन्ही किंमतीतील फरकाबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही. ग्राहक ६ महिन्यांचा नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील निवडू शकतात.
  • ला गेल्यावर्षी जानेवारीत २,४९९ डॉलर (जवळपास १,८५,७०० रुपये) किंमतीत अमेरिकेत लाँच करण्यात आले होते.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SZIly3