Full Width(True/False)

बाबो! योगा दिनाच्या शुभेच्छा देताना बेबोनं शेअर केला बिकीनीतला फोटो

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत टिकून राहायचं असेल तर फिटनेसला पर्याय नाही हे ओळखून अनेक कलाकार योग आपलासा केला आहे. त्यापैकीच एक आहे . करिना तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. फिट राहण्यासाठी ती जीममध्ये घाम गाळताना दिसते. तसंच ती नियमीत योगाही करते. आज 'आंतरराष्ट्रीय योग दिना'निमित्त तिनं शुभेच्छा दिल्यात. पण शुभेच्छा देण्यासाठी तिनं शेअर केलेल्या फोटोची जास्त चर्चा सुरू आहे. योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी करिनानं बिकीनीतला फोटो शेअर केला आहे. करिना समुद्र किनाऱ्यावर बिकीनीत योग करताना दिसून येत आहे. या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्यचा वर्षाव केला जात असला तरी अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं आहे. करिना बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. काही वर्षांपूर्वी तिची झिरो साइझबद्दलची कल्पना चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत होती. ती नेहमीच स्वतःला फिट ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आली आहे. लॉकडाउनमध्येही तिने फिट राहण्यासाठीचे प्रयत्न सोडलेले नाहीत.करिना तिच्या वजनाच्या बाबतीत मुळीच हयगय करत नाही. याचा प्रत्यय तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आला आहे. लॉकडाउन असल्याने जिम बंद आहेत. परंतु, त्यामुळे करिनाला काहीही फरक पडलेला नाही. तिने व्यायामाच्या वेळापत्रकात मुळीच बदल केलेला नाही. सीतेच्या भूमिकेवरून वादातकरिना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ाला रामायणावर आधारित एका चित्रपटात सीतेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. परंतु, या भूमिकेसाठी करिनाने तब्बल तिच्या मानधनाच्या दुप्पट म्हणजे १२ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे चाहते तिच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत. ट्विटरवर करिनाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. करिनाला सीतेची भूमिका दिल्यास चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची ताकीद युझर्सनी दिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xAKSxh