Full Width(True/False)

'मुलीने प्रेग्नन्ट असल्याचं सांगितलं तर काय करशील?' युझरचा प्रश्न

मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता आणि त्याची मुलगी यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग आहे. नुकत्याच झालेल्या फादर्स डे दिवशी आलियानं तिच्या यूट्यूब चॅनेलवर अनुरागसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया तिच्या वडिलांना काही प्रश्न विचारताना दिसत आहे. जे युझर्सना त्याला विचारायचे असतात. पण यात एका युझरनं अनुरागला आलियाबद्दल एक विचित्र प्रश्न विचारला, 'जर तुझ्या मुलीनं तुला सांगितलं की ती प्रेग्नन्ट आहे तर तुझी प्रतिक्रिया काय असेल.?' अर्थात अनुरागनं या प्रश्नाचं तेवढंच दमदार उत्तरही दिलं. युझरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना अनुराग म्हणाला, 'सर्वात आधी मी तिला विचारेन की, तिला हे बाळ हवं आहे आणि त्यानंतर तिचा जो निर्णय असेल त्यात मी तिच्या सोबत असेन. मी तिला ती जशी असेल तशी स्वीकारेन आणि तिला जे करायचं असेल किंवा त्या बाळाबाबत जो निर्णय घ्यायचा असेल त्यात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेन.' या व्हिडीओमध्ये अनुराग सांगतो, 'आजच्या काळातील मुलं खूपच व्यक्त होणारी आणि स्पष्टपणे बोलणारी आहेत. पण माझ्या काळात असं नव्हतं आमच्याकडे असं काही बोलण्याची हिंमतही नव्हती. त्यामुळे पालकांनी मुलांवर आपले निर्णय लादणं बंद करायला हवं' याच व्हिडीओमध्ये अनुरागला मुलीचा बॉयफ्रेंड कसा वाटतो असाही प्रश्न विचारण्यात आला. ज्याचं उत्तर देताना तो म्हणाला, 'तो एक चांगला मुलगा आहे. मला तो आवडतो कारण तो आध्यामिक आहे.' अनुरागचं बोलणं ऐकून मुलगी आलिया खूश झालेली पाहायला मिळते. अनुराग कश्यपची मुलगी तिच्या शिक्षणासाठी न्यूयॉर्कमध्ये असते. ती जवळपास १० महिन्यांनंतर भारतात परतली आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंडही भारतात आला आहे. तिनं तिच्या सोशल मीडियावर न्यूयॉर्क ते भारत प्रवासाचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. यासोबतच ती अनेकदा बॉयफ्रेंडसोबतचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xHMjdq