Full Width(True/False)

'सीक्रेट चाइल्ड'वर अविका गौरचा खुलासा; म्हणाली आम्ही १३ वर्षे एकत्र होतो, पण...

मुंबई: ‘’फेम अभिनेत्री हिनं‘ससुराल सिमर का’ या मालिकेत तिनं एक भूमिका साकारली होती. मधल्या काळात बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नसलं, तरी दाक्षिणात्य चित्रपटांमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात राहिली. तसंच तिच्या खासगी आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली. वडिलांच्या वयाचा असेलेला अभिनेता याच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण दोघांनीही यावर प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. अफेअरच्या चर्चा सुरू असतानाच मनीष रायसिंघन यानं संगीतासोबत लग्न केलं तर अविकानं देखील मिलिंद चंदवानी याच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अविका आणि मनीष यांच्या त्यांच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे. अविका आणि मनीष यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू असतानाचं दोघांचं एक बाळ असून त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवल्याचं म्हटलं गेलं. परंतु आता या दोघांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे. अविका आणि मनीष यांनी 'ससुराल सिमर का' या मालिकेत एकत्र काम केलं होतं च्यानंतर दोघांच्या अफेअर आणि 'सीक्रेट चाइल्‍ड'च्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर अविकानं आता तिची प्रतिक्रिया दिली आहे. 'हे शक्यच नाही. अशा अनेक बातम्या वाचल्या पण याला काहीही अर्थ नाहीए. हो आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आहोत. माझ्या आयुष्यात त्याचं स्थान महत्त्वाचं असणार आहे. माझ्या आयुष्यातील १३ वर्षे आम्ही एकत्र घालवली आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत', असं अविकानं म्हटलं आहे. तसंच ' मी त्याच्याकडून खूप काही शिकले आहे. मनीष माझ्याहून १८ वर्षांनी मोठा आहे. जेव्हा मला आमच्या नात्याविषयी विचारतात तेव्हा माझ्याकडे एकच उत्तर असतं. ते म्हणजे तो माझ्या वडिलांपेक्षा काही वर्षांनेच लहान आहे तो', असंही अविकानं म्हटलं आहे. कोण आहे मिलिंद चंदवानी? असं अविकाच्या प्रियकराचं नाव आहे.रोडीज या शो मधून मिलिंद प्रसिद्धीस आला होता. सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्याची ओळख आहे. अविका आणि मिलिंद यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा देखील अविकानं शेअर केला आहे. एका एनजीओच्या वर्कशॉप दरम्यान दोघांची भेट झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UuPkzz