Full Width(True/False)

'अनेकांना वाटतं मी अशोक- निवेदिता सराफ यांची मुलगीच'

मुंबई : मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मालिका, सिनेमामध्ये अभिनय करून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'बस्ता' या सिनेमात सायली दिसली होती. सायली संजीव ही आणि यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. या गोष्टीबद्दलचा किस्सा आणि त्याबाबतचा खुलासा खुद्द सायलीनेच एका मुलाखतीमध्ये केला आहे. काय सांगितले सायलीने एका रेडिओ चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये सायलीला एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला होता की, 'तुम्ही अशोक आणि निवेदिता सराफ यांची मुलगी आहात का? त्यावर सायलीने उत्तर दिले की, 'असे तुम्ही समजू शकता. माझी काहीच हरकत नाही...' त्यानंतर सायलीने पुढे सांगितले, 'असा प्रश्न अनेकांनी मला याआधीही विचारला आहे. परंतु माझ्या वडिलांचे नाव संजीव चंद्रशेखर आणि आईचे नाव शुभांगी चंद्रशेखर आहे.' लोकांचा असा गैरसमज का होतो, असा प्रश्न सायलीला विचारला. त्यावर सायलीने उत्तर दिले की, 'मी खूपशी निवेदिताताई सारखी दिसते. अशोक मामा आणि निवेदिता ताईला मुलगी नाही. त्यामुळे असा अनेकांचा समज होतो. अर्थात अशोक मामा आणि निवेदिता ताईने नेहमीच मला मुलीसारखे वागवले आहे.' सायली संजीवने 'काहे दिया परदेस' मालिकेतून मनोरंजन सृष्टीमध्ये प्रवेश केला. सायलीने यामध्ये गौरी ही भूमिका साकारली होती. 'काहे दिया परदेस' मालिका २०१६ मध्ये प्रसारित झाली होती. तिचे ४४० भाग प्रसारित झाले. सायली संजीवसह या मालिकेत ऋषी सक्सेना, सुलभा देशपांडे, मोहन जोशी, शुभांगी गोखले यांनी काम केले होते. सध्या सायली 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत काम करत आहे. छोट्या पडद्याबरोबरच सायलीने आता सिनेमातही काम करायला सुरुवात केली आहे. लवकरच तिचा 'ताठ कणा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले असून त्यात दिप्ती देवी, सुयोग गोऱ्हे, उमेश कामत हे देखील दिसणार आहेत. त्याचप्रमाणे एबीसी या सिनेमात तसेच हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' सिनेमातही सायलीने काम केले आहे. यामध्ये तिच्यासोबत सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी गोडबोले, क्षिती जोग, सुहास जोशी आणि सुचित्रा बांदेकर आहेत. त्याचप्रमाणे हेमंत ढोमे याच्या 'सातारचा सलमान' या आणखी एका सिनेमात प्रमुख भूमिकेत सायली दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pjFlZ2