Full Width(True/False)

The Family man 2- इथे वाचा या सीरिजशी निगडीत सर्वकाही

मुंबई- बॉलिवूड अभिनेता यांच्या वेब सीरिजची चर्चा सर्वाधिक होती. ही सीरिज कधी येणार याचीच वाट प्रेक्षक पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा निर्मात्यांनी दोन तास आधीच संपवली. त्याचं झालं असं की ही सीरिज ठरलेल्या वेळेच्या सुमारे दोन तास आधीच रिलीज करण्यात आली. 'द फॅमिली मॅन २' शुक्रवारी, ४ जून २०२१ रोजी मध्यरात्री म्हणजेच १२ वाजता प्रदर्शित होणार होती. परंतु निर्मात्यांनी गुरुवारी रात्री १० च्या सुमारासच सीरिज रिलीज केली. वेब सीरिजमध्ये आहेत एकूण नऊ भाग मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन २' वेब सीरिजमध्ये एकूण नऊ भाग आहेत. ही सीरिज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसिद्ध झाली आहे. प्राइम व्हिडिओची ही मूळ सीरिज आहे. अशात ही सीरिज ऑनलाइन पाहण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला प्राइम व्हिडिओ अॅप डाउनलोड करून त्याचे सबस्क्रिप्शनही घ्यावे लागेल. वेब सीरिजची कथा राज आणि डीके यांनी 'द फॅमिली मॅन २' चे दिग्दर्शन केले आहे. यावेळी पुन्हा श्रीकांत तिवारी कथेचं मुख्य पात्र आहे. तो एनआयएची नोकरी सोडून एक साधी नोकरी करत सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत असतो. पण त्याचे मन मात्र अजूनही एनआयएमध्येच असते. घरात बायकोशी संबंध बिघडत असतात पण मनोज ते संबंध चांगले करण्यासाठी सतत प्रयत्न करताना दिसतो. परंतु यादरम्यान, देशाच्या दक्षिण भागात दहशतवाद्यांचं प्रस्त वाढत चाललं आहे. तमिळ भाषिक संघटनेत राजी म्हणजे राजलक्ष्मी मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते. श्रीकांत तिवारी हे थांबविण्यासाठी परत एनआयएमध्ये जातो आणि इथूनच कथा पुढे सरकते. मनोज बाजपेयी आणि समंथा यांची प्रमुख भूमिका 'द फॅमिली मॅन २' मध्ये मनोज बाजपेयी एजंट आणि विश्लेषक श्रीकांत तिवारी याच्या भूमिकेत आहेत. त्याच्यासोबत ही दहशतवादी राजलक्ष्मीच्या भूमिकेत दिसत आहे. मनोज आणि समंथाशिवाय शरिब हाश्मी, नीरज माधव, पवन चोप्रा, गुल पनाग, श्रेया धनवंतरी, प्रियामनी, सीमा बिस्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, शहाब अली आणि वेदांत सिन्हा या कलाकारांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका या वेब सीरिजमध्ये आहेत. 'द फॅमिली मॅन २' चा वाद दरम्यान, देशातील तमिळ भाषिक लोकांचा एक समुह 'द फॅमिली मॅन २' या वेब सीरिजच्या विरोधात उभा राहिला. त्यांचा असा आरोप आहे की ही वेब सीरिज हिंदी भाषिक लोकांना लक्षात घेऊन तयार केली गेली आहे आणि तमिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखवले गेले आहे. यामुळे तमिळ भाषिक लोकांची प्रतिमा बदनाम होत आहे. लोकांनी वेब सीरिजवर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. बर्‍याच तामिळ राजकीय पक्षांनीही वेब सीरिजला विरोध दर्शविला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vSipm3