मुंबई: बॉलिवूडमधील सुपरफिट मॉम आणि अभिनेत्री आज ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ८ जून १९७५ साली मंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेली शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. दोन मुलांची आई असलेली शिल्पा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फिटनेससाठी प्रेरित करताना दिसते. शिल्पानं १९९१ साली वयाच्या १६ व्या वर्षी एका जाहिरीततून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९९३ साली तिनं 'बाजीगर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिल्पा शेट्टीनं तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. पण आपल्या चित्रपटांपेक्षा काही वादग्रस्त कारणांनी शिल्पा जास्त चर्चेत राहिली. बालपणी शिल्पानं भरतनाट्यम शिकलं तिला नृत्याची विशेष आवड होता. याशिवाय ती शाळेच्या वॉलीबॉल टीमची कर्णधार तसेच कराटे ब्लॅक बेल्ट सुद्धा होती. बॉलिवूडमधील यशस्वी करिअरनंतर शिल्पा २००९ मध्ये उद्योगपती राज कुंद्राशी लग्नाच्या बेडीत अडकली. पण त्यावेळी राजच्या पहिल्या पत्नीनं शिल्पावर गंभीर आरोप लावले होते. शिल्पामुळे राजनं आपल्याला घटस्फोट दिला असं तिनं म्हटलं होतं. अर्थात त्यानंतर काही काळानं तिनं शिल्पाची माफीही मागितली होती. २००६ साली शिल्पाच्या विरोधात अश्लिलतेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली वॉरन्ट निघालं होत. मुंबईमध्ये एका एड्स जागरुकता कार्यक्रमात हॉलिवूड स्टार रिचर्ड गियर यांनी शिल्पा शेट्टीला मिठीत घेत जबरदस्ती किस केलं होतं. याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते आणि या घटनेवरून बरेच वादही झाले होते. शिल्पा शेट्टीच्या बॉलिवूड कारकिर्दित तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं. पण तिच्या पहिल्या अफेअरबद्दल बोलायचं तर सर्वात आधी तिचं नाव अभिनेता अक्षय कुमारसोबत जोडलं गेलं होतं. ९० च्या दशकात शिल्पानं तिच्या आणि अक्षय कुमारच्या अफेअरचं वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल एका मासिकाच्या विरोधात केस दाखल केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ivJQyt