नवी दिल्ली : ने आपल्या बहुप्रतिक्षित मिड-रेंज Poco M3 Pro 5G ला अखेर भारतात लाँच केले आहे. नावानुसार, हा फोन ५जी सपोर्टसह येतो. एम३ प्रो ५जी मध्ये ६.५ इंच फुलएचडी+ स्क्रीन, ६ जीबीपर्यंत रॅम मिळेल. हँडसेटला दोन रॅम व स्टोरेज आणि तीन रंगांच्या व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः Poco M3 Pro 5G: किंमत व उपलब्धता च्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये, ६ जीबी रॅम + १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे. फोनची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट वर १४ जूनपासून सुरू होईल. कंपनीच्या पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी केल्यास ५०० रुपये सूट मिळेल. म्हणजे, दोन्ही फोनला सूटसह क्रमशः १३,४९९ आणि १५,४९९ रुपयात खरेदी करता येईल. POCO M3 Pro 5G: स्पेसिफिकेशन्स पोको एम३ प्रो ५G मध्ये ६.५ इंच (१०८०×२४०० पिक्सल) फुलएचडी+ स्क्रिन देण्यात आली आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन मिळते. हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिटी ७०० प्रोसेसर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी यात माली- जी५७ MC२ जीपीयू मिळेल. फोनमध्ये ४ जीबी + ६४ जीबी आणि ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज पर्याय मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवता येईल. वाचाः पॉवरसाठी फोनमध्ये ५०००एमएएचची दमदार बॅटरी मिळेल, जी १८वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२ काम करतो. ड्यूल सिम सपोर्ट फोनमध्ये ३.५ एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ सपोर्ट मिळेल. फोनला बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल ४G VoLTE, वाय-फाय ८०२.११ एसी, ब्लूटूथ ५.१, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स मिळतात. पोको एम३ प्रो ५G मध्ये अपर्चर एफ/१.७९ सोबत ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, २ मेगापिक्सल डेप्थ आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळेल. रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसोबत येतो. फ्रंटला अपर्चर एफ/२.० सोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचे डायमेंशन १६१.८१x७५.३४x८.९२ मिलीमीटर आणि वजन १९० ग्रॅम आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w3KV4o