मुंबई- बॉलिवूड अभिनेता , दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी आणि अभिनेत्री यांच्या दर्जेदार अभिनयाने सजलेली '' समोरील संकटं संपायचं नाव घेत नाहीयेत. ४ जूनला प्रदर्शित झालेल्या 'द फॅमिली मॅन २' वेबसीरिजचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून चाहत्यांकडून वेबसीरिजमधील कलाकारांचं देखील कौतुक करण्यात येत आहे. परंतु, दुसरीकडे तामिळ प्रेक्षक मात्र अजूनही वेबसीरिज विरोधात आहेत. वेबसीरिजमधून तामिळ क्षेत्र चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर ट्विटरवर देखील वेबसीरिजला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हाही तामिळ जनतेने या वेबसीरिजचा विरोध केला होता. परंतु, त्यावेळेस वेबसीरिजचे निर्माते आणि कलाकारांनी प्रेक्षकांना आधी वेबसीरिज पाहून मग मत बनवण्याची विनंती केली होती. आता वेबसीरिज प्रदर्शित होऊनही प्रेक्षकांचा विरोध कायम आहे. आता तर वातावरण आणखीनच तापलं आहे. पुन्हा एकदा ट्विटरवर 'फॅमिली मॅन २' विरोधात #Familyman2_against_tamil हॅशटॅग ट्रेण्ड करत आहे. या वेबसीरिजद्वारे तामिळ क्षेत्राबद्दल चुकीचे संदेश पसरवले जात असल्याचं तामिळ प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तामिळ जनतेला अत्यंत वाईट पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप निर्मात्यांवर केला गेला आहे. वेबसीरिजला विरोध म्हणून युझर्सनी ट्विट करत वेबसीरिज बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. तर काही युझर्सनी अमेझॉनला योग्य निर्णय घेण्याची ताकीद दिली आहे. एका युझरने अमेझॉन प्राइम व्हिडिओला टॅग करत लिहिलं, 'सगळं काही त्यावर निर्भर करत की अमेझॉन 'फॅमिली मॅन २' वर काय कारवाई करतं.' वेबसीरिज तामिळ विरोधात असल्याचं सांगत अनेक युझर्सनी वेबसीरिजला कडाडून विरोध केला आहे. तर काहींनी अमेझॉनला अँप डिलीट करून सगळ्या सेवा बंद करण्याची धमकी दिली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w4K3g0