मुंबई- बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. त्याचं जाणं सगळ्यांच्या मनाला चटका देऊन गेलं. सुशांतच्या जाण्याने अनेकांना फार मोठा धक्का बसला होता. त्यातील एक होते सुशांतचे जवळचे मित्र आणि बॉलिवूडचे लेखक- दिग्दर्शक . येत्या १४ जूनला सुशांतला जाऊन एक वर्ष पूर्ण होईल. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रुमी सुशांतबद्दल बोलताना भावुक झाले. सुशांतला त्याच्या वागण्याचा जाब विचारणार असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट करून दिली. सुशांतच्या जाण्याबद्दल बोलताना रुमी म्हणाले, 'देवाने असं काही केलं पाहिजे की, मी सुशांतला ओरडेन आणि त्याला विचारेन तू असं का केलंस? का तू आम्हाला सगळ्यांना असा सोडून निघून गेलास? सुशांत माझा जुनिअर होता पण माझा मित्र होता. मी त्याच्याकडून खूप गोष्टी शिकलो. एवढा चांगला व्यक्ती, नेहमी हसतमुख, कामाबद्दल बोलणं, माझ्या घरातल्यांना त्याच्या घरातील व्यक्तींप्रमाणे मान देणं आणि एक असा कलाकार जो प्रतिभावान होता. खूप कमी लोक असे असतात. मला सुशांतच्या कुटुंबाबद्दल विचार करून खूप वाईट वाटतं. त्यांनी सुशांतला वाढवलं. आता त्यांना किती वाईट वाटत असेल. आम्ही खूप कमी दिवस त्याला ओळखत होतो पण त्याच्यासोबत मनाचं एक नातं तयार झालं होतं. त्याच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं खूप मोठं नुकसान झालंय. सुशांत आणि त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगताना रुमी म्हणाले, 'त्याच्या जाण्याने माझा वैयक्तिक तोटा झाला आहे. त्याला मी कधीच विसरू शकत नाही. देव करो आणि तो आता जिथेही आहे आनंदी असो. मला आठवतंय की मागच्या वर्षी लागलेल्या लॉकडाउनमध्ये आम्ही ठरवलं होतं की मे महिन्यापासून चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करायचं. तो एक उत्कृष्ट डान्सरही होता. तेव्हा तो मला म्हणाला होता की सर मी या गाण्यावर बिनधास्त डान्स करणार आहे. याआधी त्याने अनेक चित्रपटात डान्स केला पण त्यात सुशांतने १०० टक्के दिले नव्हते. आम्ही ते देखील करणार होतो. त्याच्यासाठी बनवलेल्या कथेवर आता दुसऱ्या कुठल्या अभिनेत्याला घेणं मला शक्य नाही. त्याचा हसता- खेळाता चेहरा पाहून मी ती कथा लिहिली होती. त्याच्यासारखं दुसरं कुणीच नसल्याने तो चित्रपट आता बनणार नाही. त्याचा हसरा चेहरा मी कधीही विसरू शकणार नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34VJuc8