नवी दिल्ली : संकटाच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. यातच आता फेक अ‍ॅप्सशी संबंधित एक ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या फ्रॉडमध्ये सर्वसामान्य व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात पैसे लुटले जात होते. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने चीनी नागरिकांकडून चालवल्या जाणारा हा स्कॅम उघडकीस आणला आहे. यात डेटा चोरी करून बनावट गुंतवणूक अ‍ॅप्सद्वारे ५ लाखांपेक्षा अधिक भारतीयांची १५० कोटींची फसवणूक केली आहे. वाचाः फसवणूक करणारे लोक आर्थिक गुंतवणूक योजना चालवत होते व त्यांनी लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचा व जबरदस्त रिटर्न देण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी खुलासा केली की, हे अ‍ॅप चीनी नागरिकांद्वारे फसवणुकीसाठी मल्टीलेव्हल मार्केटिंग मॉडेलचा वापर करून चालवले जात आहे. अ‍ॅपद्वारे गुंतवणूक करणे आणि गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळवण्याचे लालच दाखवले जात होते. सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५ ते १० टक्के परतावा दिला जात होता. यामुळे गुंतवणूकदाराला कोणताही धोका वाटत नाही व त्यानंतर मित्र, नातेवाईकांसह अनेकांना गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळाल्यावर अ‍ॅपवरील खाते ब्लॉक केले जाते. या सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केले आहे. दिल्ली पोलिसांनी दोन चार्टर्ड अकाउंटसह ११ लोकांना ताब्यात घेतले आहे. वाचाः प्ले स्टोरवर आहेत अनेक बनावट अ‍ॅप्स सायबर क्राइम सेलचे डेप्यूटी कमिशनर अन्येश रॉय यांच्यानुसार, या गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात अशा अ‍ॅप्सचा प्रसार करण्यात आला होता व यातील काही वर देखील उपलब्ध होते. फसवणुकीतून गोळा करण्यात आलेली रक्कम जवळपास १५० कोटी रुपये आहे. मात्र, आतापर्यंत कॅश , बँक खाते आणि गेटवे पेमेंटद्वारे १२ कोटी रूपये वसूल करण्यात आले आहे. ५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी अशा अ‍ॅप्समध्ये गुंतवणूक केली आहे. डीसीपींनी सांगितले की, या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य चिनी हँडलर व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम सारख्या अ‍ॅप्सवर लोकांशी संपर्क करत असे व इच्छूक व्यक्तींना बनावट बँक खाते खरेदी करणे, शेल कंपन्या, अ‍ॅप्सचा प्रसार करण्यासाठी लोकांना पार्टनर बनवत असे. सोशल मीडियावर पॉवर बँक आणि इजी प्लान सारख्या अ‍ॅप्सबाबत तक्रारी येत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. भारतातील कोणत्या भागात होत होती फसवणूक पश्चिम बंगाल, दिल्ली-नोएडा (एनसीआर), बंगळुरू, ओडिसा, आसाम आणि सुरत या शहरात हे सायबर गुन्हेगार राहत होते. या लोकांनी टेलिग्राम चॅनेलद्वारे अनेकांची भर्ती केली होती जे त्यांच्यासाठी पब्लिसिटी करतील, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gdryjJ