नवी दिल्ली : भारतीय सैन्याने जवानांना ट्विटरवरून , आणि ईमेलद्वारे येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध केले आहे. Additional Directorate General of Public Information ने म्हटले आहे की, त्यांना काही बनावट मेसेज आढळले आहेत, ज्यात आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, राष्ट्रीय रायफल्स आणि बेस हॉस्पिटल दिल्ली कन्टॉन्मेंटकडून हे मेसेज आल्याचा दावा केला जातो. कोरोना लसीसंदर्भात हे मेसेज जवानांना पाठवले जात आहेत. वाचाः या मेसेजमध्ये घेतल्याच्या डिजिटल सर्टिफिकेट्ससाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. डिपार्टमेंटने जवानांना अशा मेसेजपासून सावध राहण्यास, कोणत्याही लिंकवर क्लिक न करणे व अशा मेसेजला उत्तर देऊ नये असे सांगितले आहे. डिपार्टमेंटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत माहिती दिली की, जवानांना बनावट मेसेज येत आहेत, ज्यात कोरोना लसीकरणाच्या डिजिटल सर्टिफिकेटसाठी , एसएमएस आणि ईमेलमधील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. अशा मेसेजला उत्तर देऊ नये, असा सल्ला डिपार्टमेंटने दिला आहे. वाचाः गुन्हेगार कोरोना सकंटाचा फायदा घेत मालवेअर पसवरत आहे व यूजर्सची खासगी माहिती चोरी करत आहे. काही दिवसांपूर्वीच ने देखील सूचना जारी करत फेक वॅक्सिन रजिस्ट्रेशन अ‍ॅपबाबत सावध केले होते. CERT-In सांगितले की, हे बनावट मेसेज एसएमएसच्या साह्यायने पसरवले जात आहेत व यात अ‍ॅपद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करण्यास सांगितले जाते. एसएमएसद्वारे यूजर्सला अँड्राइड फोनमध्ये ५ APK फाइल्स डाउनलोड करण्यास व अ‍ॅप इंस्टॉल करण्यास सांगितले जाते. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून पासवर्ड व इतर खासगी माहिती चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iyMzqB