Full Width(True/False)

भारतात 'मेड इन इंडिया' स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त ४९९९ रु.

नवी दिल्लीः देशातील मोबाइल बनवणारी कंपनी कार्बन (Karbonn) ने आपला आणखी एक नवीन एंट्री लेवल बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. कार्बनचा हा नवीन स्मार्टफोन स्वस्त किंमतीचा आहे. या फोनचे नाव आहे. देसी कंपनी कार्बनच्या या स्मार्टफोनची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. कार्बन एक्स २१ स्मार्टफोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ही माहिती गिज्मोचाइनाच्या एका रिपोर्टमधून समोर आली आहे. कार्बन X21 स्मार्टफोनला या वर्षी मार्च मध्ये गुगल प्ले कन्सोलवर पाहिले गेले होते. वाचाः 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते स्टोरेज Karbonn X21 स्मार्टफोनमध्ये ग्लॉसी रियर पॅनेल सोबत प्लास्टिक बिल्ड आहे. कार्बनचा हा स्मार्टफोन अॅक्वा ग्रीन आणि मिडनाइट ब्लू इन २ कलर ऑप्शन मध्ये येतो. स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाचा LCD पॅनेल दिले आहे. कार्बन X21 स्मार्टफोन मध्ये UNISOC SC9863 प्रोसेसर दिले आहे. स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबीचे स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसाठी फोनच्या स्टोरेजला १२८ जीब पर्यंत वाढवता येऊ शकते. स्मार्टफोन मध्ये 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. वाचाः फोनच्या बॅकला ८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा स्मार्टफोनच्या बॅक मध्ये मेन कॅमेरा ८ मेगापिक्सलचा दिला आहे. सोबत LED फ्लॅश दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंट मध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनच्या कनेक्टिविटीसाठी ड्यूल-सिम, 4G, सिंगल-बँड Wi-Fi आणि ब्लूटूथ 4.2 ला सपोर्ट करतो. कार्बन X21 स्मार्टफोन Android 10 Go Edition वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 3,000 mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vubJcJ