Full Width(True/False)

स्मार्टफोनला बनवा CCTV कॅमेरा, कुठूनही ठेवा घरावर लक्ष, वापरा ‘ही’ सोपी ट्रिक

नवी दिल्ली : तुम्ही कामानिमित्त अधिक वेळ घराबाहेर असता का ? अशा स्थितीत आपल्या डोक्यात वारंवार विचार येतो की, घरातील मौल्यवान वस्तू चोरीला तर जाणार नाही ? मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही कुठूनही तुमच्या घरावर लक्ष ठेवू शकता. तुम्हाला वाटत असेल की आम्ही CCTV कॅमेऱ्याबद्दल सांगत आहोत. मात्र, कॅमेरा नाही, तर तुम्ही तुमच्या जुन्या स्मार्टफोनलाच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बदलून घरावर लक्ष ठेवू शकता. या ट्रिकबद्दल जाणून घेऊया. वाचाः काय आहे ट्रिक ? जर तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या स्मार्टफोनचा वापर करत नसाल तर त्याला कॅमेरा बनवू शकता. यासाठी तुमच्याकडे वाय-फाय असणे आवश्यक आहे व फोनची कॅमेरा क्वालिटी देखील चांगली असावी. याद्वारे तुम्ही घरात काय होत आहे ते पाहु शकता. यासाठी प्ले स्टोरवर काही अ‍ॅप्स उपलब्ध आहे. या पैकीच एक हे अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप फ्री असून, याच्या मदतीने तुम्ही घरावर लक्ष ठेवू शकता. वाचाः जुन्या फोनला याप्रकारे बनवा CCTV कॅमेरा
  • यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोरवरून या फ्री अ‍ॅपला डाउनलोड करावे लागेल.
  • जुन्या आणि सध्याच्या फोनमध्ये अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला दोन्हीमध्ये एकाच आयडीने लॉग इन करावे लागेल.
  • येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील. यातील एक व्ह्यू आणि दुसरा कॅमेरा असेल.
  • ज्या फोनचा सीसीटीव्ही म्हणून वापर करायचा आहे त्यात कॅमेऱ्यावर क्लिक करा आणि ज्यात फुटेज पाहायचे आहे त्यात व्ह्यूवर क्लिक करा.
  • यानंतर जुन्या फोनला अशा ठिकाणी ठेवा, जेथून पूर्ण घर अथवा खोलीतील सर्व गोष्टी व्यवस्थित दिसतील. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या फोनमध्ये फुटेज पाहू शकता.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SNeMQ0