मुंबई: सोशल मीडिया ते घरातील डायनिंग टेबलपर्यंत सध्या सगळीकडेच '' ची चर्चा सुरू आहे. पासून ते आणि प्रियामणी पासून ते उदय महेश पर्यंत सर्वांच्याच अभिनयाचं सध्या खूप कौतुक केलं जात आहे. खासकरून समंथानं साकारलेल्या 'राझी' या व्यक्तिरेखेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. वेब सीरिजमधील व्यक्तीरेखांपासून ते वेब सीरिजच्या कथेपर्यंत सर्व गोष्टींचं कौतुक होताना दिसत आहे. अशात आता या वेब सीरिजसाठी कलाकारांनी किती मानधन आकरलं आहे याची माहिती समोर आली आहे. या वेब सीरिजशी संबंधीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका हिंदी वेब साइटनं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ज्यात समंथा अक्किनेनी ते प्रियामणीपर्यंत सर्वांच्याच मानधनाची माहिती देण्यात आली आहे. समंथा अक्किनेनी अभिनेत्री समंथा अक्किनेनीनं या वेब सीरिजमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. या वेब सीरिजमधील 'राझी' ही खतरनाक व्यक्तिरेखा साकरण्यासाठी तिनं ३-४ कोटी रुपयांचं मानधन आकारलं आहे. प्रियामणी सुचित्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियामणी हिनं ८० लाख एवढं मानधन आकारल्याचं बोललं जात आहे. प्रियामणी ही दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिनं 'चेन्‍नई एक्‍सप्रेस'सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शारिब हाश्मी अभिनेता शारिब हाश्मीनं या वेब सीरिजमध्ये जेके म्हणजेच श्रीकांतच्या मित्र आणि सहकाऱ्याची भूमिका साकारली आहे. 'स्‍लमडॉग मिलेनियर', 'जब तक है जान' आणि 'पगलैट' या चित्रपटांमध्ये दिसलेल्या या अभिनेत्यानं 'द फॅमिली मॅन २'साठी ६५ लाख रुपयांचं मानधन घेतलं आहे. दर्शन कुमार अभिनेता दर्शन कुमारनं 'द फॅमिली मॅन २'मध्ये मेजर समीरची भूमिका साकारली आहे. 'मेरी कॉम' मध्ये प्रियांका चोप्रा आणि 'एनएच १०' मध्ये अनुष्का शर्मासोबत दिसलेल्या या अभिनेत्या या वेब सीरिजसाठी १ कोटी रुपयांचं मानधन आकारल्याचं बोललं जात आहे. शरद केळकर अभिनेता शरद केळकरनं 'द फॅमिली मॅन २' मध्ये अरविंद ही व्यक्तिरेखा साकारली आहे. जो श्रीकांतच्या पत्नीचा मित्र आहे. टीव्ही आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असलेल्या शरदनं या वेब सीरिजसाठी १.६ कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे. सनी हिंदुजा आणि अश्लेषा ठाकूर या वेब सीरिजमध्ये अभिनेता सनी हिंदुजानं TASC चा एजंट मिलिंदची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यानं या वेब सीरिजसाठी ६० लाखांचं मानधन घेतलं तर श्रीकांत तिवारीची मुलगी धृतीची भूमिका साकारणारी बालकलाकार अश्लेषा ठाकूरनं ५० लाख रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जातंय. मनोज बाजपेयीनं आकारलं आहे सर्वाधिक सर्वाधिक मानधन 'द फॅमिली मॅन २'चा मुख्य अभिनेता मनोज बाजपेयीनं या वेब सीरिजमध्ये साकारलेली श्रीकांत तिवारीची भूमिका प्रचंड गाजली आहे. या वेब सीरिजसाठी मनोजनं इतर कलाकारांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन आकारलं आहे. त्यानं १० कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जातंय. अर्थात याबाबतची पुष्टी प्रॉडक्शन हाऊस किंवा निर्मात्यांनी अद्याप केलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TjJeRF