मुंबई : सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यंदाच्या मौसमातील हा पहिलाच पाऊस होता. या पहिल्या पावसामध्ये नेहमी प्रमाणे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. सकाळी पडलेल्या काही तासांच्या मुसळधार सरींनीच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वा मार्गांवरही पाणी आल्याने ट्रॅक पाण्याखाली गेले होते. मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्यामुळे नेहमीप्रमाणे आरोपप्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. अभिनेता आणि यांनीही ट्विटरवर आपले मत मांडले. पण हे मत मांडताना त्यांनी आपल्या शैलीत मांडल्यामुळे ते चांगलेच व्हायरल झाले आहे. केदार शिंदे हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भिड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक घडामोडींवर केदार आपल्या मार्मिक शैलीमध्ये मत व्यक्त करत असतात. आजच्या पावसामुळे तुंबलेल्या मुंबईच्या परिस्थितीवर देखील त्यांनी असेच मार्मिक भाष्य केले आहे. केदार म्हणाले, ' या पावसाला एक अक्कल नाही. केवल ५ मी. मी. पर्यंत संरक्षणाची व्यवस्था #bmc ने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो.. ' अशा शब्दांत त्यांनी मुंबईची आजची स्थिती सांगितली आहे. ही स्थिती सांगताना त्यांनी #MumbaiRains #मुंबई-तुंबई असे हॅश टॅग वापरले आहेत. दरम्यान, पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर असल्याने मुंबई तसेच उपनगरात अनेक सखल भागांत पाणी साचले होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे हाल झाले. लोकल ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी साचले. ट्रॅक पाण्याखाली गेल्याने आणि कुर्ला आणि सायन स्थानकांतही भरपूर पाणी भरल्याने या ठिकाणची लोकल वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना पहिल्याच पावसाने अतोनात त्रास सहन करावा लागला. मुंबई महानगर पालिकेवर अशा भोंगळ कारभारावर अनेकांनी टीकाही केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gbNhc2