मुंबई- छोट्या पडद्यावरील कार्यक्रम '' दररोज नवीन वादात अडकत आहे. यापूर्वी कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर टीआरपी वाढवण्यासाठी स्पर्धकांबद्दल खोटं पसरवल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी कार्यक्रमावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर अमित कुमार यांच्या वक्तव्याने वातावरण तापलं होतं. आता कार्यक्रमात पाहुणे परीक्षक म्हणून हजेरी लावणारे लोकप्रिय बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांनीही कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर टीका केली आहे. अभिजीत यांनी कार्यक्रमाचे परीक्षक , आणि विशाल ददलानी यांना अनुभव कमी असल्याचं सांगत त्यांना आत्मकेंद्री म्हटलं आहे. जे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी परीक्षक बनतात ते परीक्षक नाहीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी म्हटलं, 'इंडियन आयडल १२' चे परीक्षक नेहा, हिमेश आणि विशाल कार्यक्रमात स्वतःला प्रसिद्धी कशी मिळेल याकडे जास्त लक्ष देतात. ते चांगले परीक्षक बनू शकत नाहीत. ते स्पर्धकांना चांगल्या गोष्टी सांगू शकणार नाहीत.' मला ती खुर्ची द्या जिच्यासाठी मी पात्र आहे अभिजित यांनी म्हटलं, 'मी काही काळापूर्वी 'इंडियन आयडल' च्या क्रिएटिव्ह हेडकडे परीक्षकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. तेव्हा मी त्यांना म्हटलं मला काम नकोय. मला ती खुर्ची हवी आहे जिच्यासाठी मी पात्र आहे. मी आज अशा ठिकाणी आहे जिथे माझ्या हाताखाली अनेक लोक काम करतात. माझ्या मुलाचा इतका मोठा व्यवसाय आहे. माझ्या जागेचं देखील बरंच काम असतं. मी कित्येक जणांना काम देतो. मला तुमच्या कामाची गरज नाहीये. मला मी पात्र असलेली खुर्ची हवी आहे.' ज्यांनी चार गाणी गायली त्यांना परीक्षकाच्या खुर्चीवर बसवतात अभिजीत यांनी नेहा, हिमेश आणि विशाल यांच्यावर निशाणा साधत म्हटलं, 'तुम्ही त्यांना बोलवता ज्यांनी फक्त चार गाणी गायली आहेत. ज्यांना कोणताही अनुभव नाही. ज्यांचं या संगीत क्षेत्रासाठी कोणतंही योगदान नाही. ते सगळे फक्त पैशांसाठी काम करतात. त्यांनी फक्त या काळात हीट दिले पण संगीतासाठी काहीच नाही केलं. त्यांना तुम्ही परीक्षकांच्या खुर्चीवर बसवता.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vemaBp