नवी दिल्ली : कंपनी आज भारतीय बाजारात आपली Note 10 सीरिज लाँच करणार आहे. या अंतर्गत कंपनी आणि हे दोन स्मार्टफोन्स भारतात सादर करेल. कंपनीने याबाबतची माहिती ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत दिली आहे. यावर Flipkart चा लोगो देण्यात आला आहे. यावरून या फोनला Flipkart एक्सक्लूसिव्ह बनवले जाण्याची शक्यता आहे. या सीरिजला कंपनीने गेल्या महिन्यातच भारताच्या बाहेर लाँच केले होते. या फोन्सचे संभाव्य फीचर्स काय आहेत पाहुयात. वाचाः Infinix Note 10 Pro चे संभाव्य फीचर्स: Infinix Note 10 Pro स्मार्टफोन अँड्राइड ११ वर काम करेल. यात ६.९५ इंचचा IPS LCD FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन २४६०x१०८० असण्याची शक्यता आहे. याचा रिफ्रेट रेट ९० Hz असू शकता. यात मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २ टीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सल, तिसरा २ मेगापिक्सल आणि चौथा २ मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा सेंसर मिळेल. पॉवरसाठी यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः Infinix Note 10 चे संभाव्य फीचर्स: हा फोन अँड्राइड ११ वर काम करेल. सोबतच यात ६.९५ इंचचा PS LCD FHD+ डिस्प्ले दिला जाईल, ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन २४६०x१०८० असण्याची शक्यता आहे. फोन मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर सोबत येईल. यात ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंतचे स्टोरेज मिळू शकते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवता येईल. Infinix Note 10 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल, दुसरा २ मेगापिक्सल आणि तिसरा २ मेगापिक्सल सेंसर असेल. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी ५००० एमएएच ची दमदार बॅटरी मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fWzjKQ