Full Width(True/False)

JioFiber चे नवीन पोस्टपेड प्लान्स लाँच, इंस्टॉलेशन देखील मोफत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन प्लान्स आणत असते. आता कंपनीने यूजर्ससाठी नवीन फायबर पोस्टपेड प्लान्स आणले आहे. कंपनीने या प्लानच्या लाँचिंगसोबतच नवीन ग्राहकांना बॉक्स (राउटर) मोफत देणार असल्याचे देखील सांगितले आहे. वाचाः केवळ ३९९ रुपयांपासून सुरू होणारे हे नवीन १७ जूनपासून लागू होतील. ग्राहकांना इंस्टॉलेशनचे शुल्क द्यावे लागणार नाही. यामुळे ग्राहकांचे १५०० रुपये वाचतील. मात्र, मोफत राउटर आणि मोफत इंस्टॉलेशन हे कमीत कमी सहा महिन्याच्या प्लान्सवर मिळेल. Reliance Jio च्या नवीन पोस्टपेड प्लानचे वैशिष्ट्ये म्हणजे यात अपलोड आणि डाउनलोडची स्पीड एकसमान असेल. JioFiber ३९९ Postpaid Plan: ग्राहकांना या प्लानमध्ये ३० Mbps स्पीडने डेटा मिळेल. JioFiber ६९९ Postpaid Plan: जिओच्या या प्लानमध्ये १०० Mbps स्पीडने डेटा मिळेल. JioFiber ९९९ Postpaid Plan: ९९९ रुपयांच्या या प्लानमध्ये १५० Mbps स्पीडने डेटा मिळेल. JioFiber १४९९ Postpaid Plan: जिओच्या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३०० Mbps स्पीडने डेटा मिळेल. JioFiber ९९९ Postpaid Plan: ९९९ रुपयांच्या Jio Fiber कनेक्शनसोबत ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यात , , Sony LIV, G-5, Voot Select, Sun Nact आणि Hoichoi सारख्या १४ OTT अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. १४९९ Postpaid Plan: Reliance Jio च्या या पोस्टपेड Jio Fiber कनेक्शनमध्ये ओटीटी अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. यात Amazon Prime, Disney Hotstar, Sony LIV, G-5, Voot Select, Sun Nact आणि Hoichoi सारख्या १५ OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच, १ हजार रुपये सिक्युरिटी डिपॉजिटवर ४के सेट टॉप बॉक्स मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wpoLK1