Full Width(True/False)

एकदम सोपी ट्रिक, ‘या’ पद्धतीने सहज हटवा PDF फाइलचा पासवर्ड

नवी दिल्ली : अनेकांना आपण महत्त्वाची कागदपत्रं, ओळखपत्र ही पीडीएफ स्वरूपात पाठवत असतो. पीडीएफ फाइल्समध्ये अनेकांची आवश्यक कागदपत्रं ठेवलेली असतात. त्यामुळे या फाइल्सला कोणीही ओपन करू नये यासाठी पासवर्डने लॉक केले जाते. मात्र, वारंवार फाइल ओपन करताना पासवर्ड टाकावा लागणे ही देखील एक मोठी समस्या असल्याने अनेकांना पीडीएफ फाइलचा पासवर्ड काढून टाकायचा असतो. जर तुम्ही देखील बँक डिटेल्स अथवा कोणत्याही महत्त्वाच्या पीडीएफ फाइलला पासवर्डने लॉक केले असेल व तुम्हाला पासवर्ड हटवायचा आहे, मात्र हे कसे करायचे माहित नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला पीडीएफ फाइलमधील पासवर्ड कसा हटवायचा ते सांगणार आहोत. अगदी सहज-सोप्या पद्धतीने तुम्ही पीडीएफ फाइलचा पासवर्ट हटवू शकता. वाचाः अँड्राइडमध्ये चा पासवर्ड कसा हटवाल ?
  • यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम क्रोम ब्राउडरवर ओपन करावी लागेल.
  • यानंतर अनलॉक करण्यासाठी पासवर्ड टाका.
  • उजव्या बाजूच्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • यानंतर Share वर क्लिक केल्यानंतर Print पर्याय निवडा. येथे Save as PDF वर क्लिक करून फाइल सेव्ह करा.
  • आता तुमची पीडीएफ फाइल विना पासवर्ड सेव्ह होईल.
कॉम्प्युटरवरून P DF चा पासवर्ड कसा हटवाल ?
  • यासाठी तुम्हाला वर पीडीएफ फाइल ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर पासवर्ड टाकून अनलॉक करण्यासाठी Ctrl+P अथवा सर्वात वरील बाजूला दिलेले Printer Icon वर क्लिक करा.
  • आता Save as PDF सिलेक्ट करून सेव्ह करा.
वरून PDF चा पासवर्ड कसा हटवाल ?
  • Mac चा उपयोग करून पीडीएफचा पासवर्ड हटवण्यासाठी फाइलला Mac वर डाउनलोड करा.
  • यानंतर Finder मध्ये जाउन फाइलवर डबल क्लिक करा. आता अनलॉक करण्यासाटी पासवर्ड टाका.
  • त्यानंतर फाइलमध्ये जाऊन Export as PDF निवडा आणि नाव टाकून सेव्ह करा.
  • आता तुमच्या पीडीएफ फाइलला ओपन करण्यासाठी पासवर्डची गरज नाही.
वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35OHK57