Full Width(True/False)

२० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत हे ५जी स्मार्टफोन्स, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः Cheapest 5G Smartphone: भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन निर्माता कंपन्या स्वस्तात ५जी स्मार्टफोन लाँच करीत आहेत. यावर्षी आतापर्यंत अनेक स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच केलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच ५जी स्मार्टफोन्स संबंधी माहिती देत आहोत. या सर्व फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Realme 8 5G रियलमीचा हा स्मार्टफोन फक्त १४ हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. हा फोन सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोनच्या यादीत नंबर वनवर आहे. या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये रियर मध्ये 48MP + 2MP + 2MP चा सेटअप दिला आहे. फ्रंट मध्ये 16MP कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनला पॉवर साठी 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः OPPO A74 5G ओप्पोच्या या स्मार्टफोनची किंमत १८ हजार रुपये आहे. हा फोन लाँचिंग नंतर ग्राहकांना खूप आवडला आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये ६.४९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज मिळतो. यात 48MP + 48MP + 2MP चा रियर कॅमेरा सेटअप आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवरसाठी 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः Moto G 5G मोटोरोलाचा हा ५जी स्मार्टफोन स्वस्त स्मार्टफोन आहे. याची किंमत २० हजार रुपये आहे. Moto G 5G स्मार्टफोन में 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज दिले आहे. याचे स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, 48MP + 8MP + 2MP चा रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000 mAh ची Li-Polymer बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. Vivo iQoo Z3 विवोच्या या स्मार्टफोनची किंमत २० हजार रुपये आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 768G प्रोसेसर, 6 GB रॅम, 128 GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 64+8+2 MP रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6 MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोन मध्ये 4400 mAh ची बॅटरी दिलीआहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qw2hVL