Full Width(True/False)

कन्फर्म! ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार Poco M3 Pro 5G स्मार्टफोन

नवी दिल्ली : कंपनी या स्मार्टफोनला ८ जूनला भारतीय बाजारात लाँच करणार आहे. कंपनीने कन्फर्म केले आहे की हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट वर उपलब्ध केला जाईल. हा फोन चे अपग्रेडेड व्हर्जन असल्याचे सांगितले जात आहे. या फोनला याच वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच करण्यात आले होते. कंपनीच्या भारतातील पोर्टफोलियामधील हा पहिलाच ५जी फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे. अ‍ॅपवर Poco M3 Pro 5G च्या लाँचिंग तारखेबाबत माहिती देण्यात आली आहे. या फोनला गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आले होते. या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया. वाचाः Poco M3 Pro 5G ची किंमत या फोनची सुरुवाती किंमत EUR १५९ (जवळपास १४,१०० रुपये) आहे. ही किंमत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. याच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR १७९ (जवळपास १५,९०० रुपये) आहे. फोन कूल ब्लू, पावर ब्लॅक आणि येलो कलरमध्ये येईल. भारतात देखील जवळपास याच किंमतीत हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. वाचाः Poco M3 Pro 5G चे फीचर्स: Poco M3 Pro 5G हा MIUI 12 वर आधारित अँड्राइड ११ वर काम करतो. यात ६.५ इंच फूल एचडी+ होल पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. तर रिफ्रेश रेट ९० Hz आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर आणि ६ जीबीपर्यंतच्या रॅमसोबत येतो. यामध्ये १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल, दुसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि तिसरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर मिळेल. फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळेल, जी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्य त आला आहे. सोबतच, AI फेस अनलॉक फीचर देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५G, एनएफसी, ड्यूल-बँड वाय-फाय, ब्लूटूथू ५.१, ३.५mm ऑडियो जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. फोन ड्यूल-सिम सपोर्टसोबत येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c7CdKf