Full Width(True/False)

Realme, Apple, Poco, Motorola स्मार्टफोन्सवर ६३ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, २४ जून पर्यंत सेल

नवी दिल्लीः नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा प्लान असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart Mobiles Bonanza सेलला २१ जून पासून सुरूवात झाली आहे. हा सेल २४ जून पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये iPhone 11, Moto Razr, Poco X3 Pro आणि अन्य स्मार्टफोन्सवर अनेक जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच Realme, Xiaomi, Samsung च्या फोनवर सूट दिली जात आहे. यासोबतच एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वर फोन खरेदीवर ग्राहकांना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः Apple iPhone फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये Apple च्या iPhone 11 ला ४९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. याची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. ही ऑफर 64GB मॉडलवर आहे. तर iPhone SE ला ३१ हजार ९९९ रुपये आणि iPhone XR ला तुम्ही ४१ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. IPhone 11 प्रो ला तुम्ही या सेलमध्ये ७४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. यासोबतच लेटेस्ट iPhone 12 सीरीजवर HDFC बँक कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. वाचाः Poco पोको X3 प्रो २० हजार रुपये सेगमेंट मध्ये येणारा सर्वात लोकप्रिय फोन आहे. Flipkart Mobiles Bonanza सेल दरम्यान Poco X3 Pro ला १६ हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. तर Poco M3 ला सर्वात स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकते. १२ हजार ५०० रुपये किंमतीचा फोन या सेलमध्ये १० हजार ४९९ रुपयात खरेदी करा. Realme या सेलमध्ये Realme Narzo 30A ला ८ हजार २४९ रुपयात खरेदी केले जाऊ शकते. फोनची सुरुवातीची किंमत १० हजार रुपये होती. या सेलमध्ये Realme X7 5G १७ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. Realme C25 आणि Realme C12 अनुक्रमे ९ हजार ९९९ आणि ८ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. Motorola फोल्डेबल Moto Razr वर सर्वात जास्त ६३ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. Moto Razr ला फ्लिपकार्टवर ५४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. Moto Razr 5G ला सुद्धा ६० हजार रुपयांच्या सूट सोबत उपलब्ध आहे. याची किंमत कमी होऊन ८९ हजार ९९९ रुपये झाली आहे. Xiaomi या सेलमध्ये Xiaomi चे Redmi 9i 4GB ला ७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. या सेलमध्ये Redmi 9 Power ला १० हजार ४९९ रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहे. Redmi 9 Prime वर सुद्धा सूट मिळत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TUwXnj