Full Width(True/False)

जास्त वापर केल्याने गरम होतो Laptop, ओव्हरहीटपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी

नवी दिल्ली : जास्त वेळ वापर केल्याने अनेकदा गरम होत असल्याची समस्या जाणवते. यामुळे लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते व गरम झाल्याने काम करताना देखील भिती वाटते. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही ही समस्या टाळू शकता. होण्यापासून टाळण्यासाठी काय करायला हवे जाणून घेऊया. वाचाः
  • अनेकदा लॅपटॉप गरम होण्याचे कारण हे लॅपटॉपची असते. अनेकजण लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करत राहतात. जास्त वेळ चार्ज केल्याने बॅटरी गरम होते. अशात जर बॅटरी खराब झाली असेल तर ती बदलावी.
  • लॅपटॉपमध्ये एक कूलिंग फॅन असतो व गरम होण्यापासून वाचण्यासाठी वेळोवेळी साफ करणे गरजेचे असते. लॅपटॉप फॅनमध्ये धूळ जमा झाल्यास कूलिंग कमी होते. त्यामुळे लॅपटॉपमधील कूलिंग फॅन काम करत नसेल तर त्वरित दुरुस्त करा.
  • ऑफिसमध्ये काम करताना सर्वसाधारणपणे लॅपटॉप डेस्क, टेबलवर असतो. मात्र घरून काम करताना मांडीवर अथवा बेडवर ठेवतो, जे चुकीचे आहे. अनेक लॅपटॉप कूलिंगसाठी खालून एयर घेतात. त्यामुळे जास्त वेळ काम करत असाल तर लॅपटॉप योग्य ठिकाणी ठेवायला हवा. जेणेकरून एयर व्हेंटिलेशन होईल.
  • तुम्ही जर जास्त वेळ काम करत असाल व लॅपटॉप गरम होण्याची समस्या जाणवत असेल तर २-३ दिवसांनी मऊ व स्वच्छ कपड्याने साफ करा. यासाठी लॅपटॉप क्लिनर ब्रश देखील येतो. तसेच, लॅपटॉप फास्ट चालावा यासाठी अनावश्यक अ‍ॅप्लिकेशन डिलीट करा. लॅपटॉपची मेमरी फूल झाल्यास तो हळू काम करतो व प्रोसेसरवर जोर पडतो. यामुळे लॅपटॉप गरम होतो.
  • दिवस-रात्र लॅपटॉप सुरूच ठेवल्यास तो गरम होणार. काम झाल्यानंतर लॅपटॉप बंद करावा. काही वेळ ब्रेक घेत असाल तर त्यावेळी स्लीप मोडवर टाका. झोपताना देखील लॅपटॉप शट डाउन करावा.
वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d1Rv3Q