नवी दिल्लीः गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी ने स्वस्त स्मार्टफोन लाँच केली होती. जर कुणाला नवीन आणि स्टायलिश स्मार्टफोन खरेदी करायची असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. आता कंपनीने या स्मार्टवॉचचा आणखी एका सिल्वर कलर व्हेरियंट मध्ये लाँच केले आहे. याआधी या वॉचचा एकच कलर व्हेरियंट होता. जो ब्लॅक होता. आता कंपनीने सिल्वर आणि ब्लॅक असे दोन कलर उपलब्ध केले आहे. वाचाः Realme Watch S ची किंमत Realme Watch S च्या सिल्वर कलर व्हेरियंटची किंमत आधीच्या इतकीच आहे. म्हणजेच ४ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टवॉचला ग्राहक ७ जून पासून खरेदी करू शकतील. कंपनीची अधिकृत वेबसाइट Realme.com आणि ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वरून ही स्मार्टवॉच खरेदी करता येऊ शकते. नवीन व्हेरियंटमध्ये फक्त नवीन कलर आणि स्टॅप्स आणि वॉच हाउसिंग वेगळा आहे. वाचाः Realme Watch S चे फीचर्स Realme Watch S सिल्वर व्हर्जन मध्ये व्हाइट सिलिकॉन स्ट्रॅप दिले आहे. यात १.३ इंचाचा राउंड टचस्क्रीन एलसीडी डिस्प्ले दिला आहे. यावर गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे. ही IP68 वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंट आहे. यात ३९० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जिंग मध्ये १५ दिवसांची बॅटरी मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात काही फिटनेस ट्रॅकिंग फंक्शन दिले आहे. यात ब्लड ऑक्सीजन, सॅचुरेशन मॉनिटरिंग सिस्टम, हार्ट रेट मॉनिटरिंगचा समावेश आहे. वाचाः Realme Watch S मध्ये स्मार्ट फीचर्स दिले आहेत. ज्यात स्मार्टफोन नोटिफिकेशन, कॉल नोटिफिकेशन टायमर आदीचा यात समावेश आहे. यात १०० हून जास्ती वॉच फेस उपलब्ध आहे. या वॉच फेसेसला रियलमी लिंक अॅपवरून डाउनलोड केले जाऊ शकते. ही वॉच अँड्रॉयड आणि iOS सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x2jHej