मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत यामीनं लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न झाल्याची घोषणा केली. अत्यंत खासगी स्वरुपाच्या समारंभात हे दोघंही विवाहबंधनात अडकले. पण त्यानंतर कोण हा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घेऊयात यामी गौतमचा पती आदित्य आणि या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल... यामी गौतमचा पती आदित्य धर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन आदित्य धरनेच केलं होतं. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. दिग्दर्शक म्हणून आदित्यचा हा पहिलाच चित्रपट होता. आदित्य धरच्या 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये यामी गौतमनं नायिकेची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिनं एका रॉ एजंटची भूमिका साकारली होती. असं म्हटलं जातं की, याच चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेपासूनच यामी आणि आदित्यची लव्हस्टोरी सुरू झाली होती. पण याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती कधीच बाहेर पडू दिली नाही. त्यामुळेच त्यांच्या या नात्याबद्दल फारसं कोणालाच माहीत नव्हतं. दिल्ली येथे १२ मार्च १९८३ रोजी जन्मलेला ३८ वर्षीय आदित्य धरनं 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाच्या अगोदर 'काबुल एक्सप्रेस', 'तेज', 'आक्रोश', 'हाल-ए-दिल' यांसारख्या चित्रपटांसाठी संवाद लेखक, पटकथा लेखक आणि गीतकार म्हणून काम केलं आहे. 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक'मध्ये अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट प्रचंड गाजला. त्यानंतर आदित्य धर आणि विकी कौशल ही जोडी 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र आली आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत सारा अली खानची मुख्य भूमिका असणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cCE2PZ