Full Width(True/False)

Video- राखी सावंतने रिक्षा चालकाला थांबवून शिकवला डान्स

मुंबई: 'बिग बॉस १४'नंतर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ज्यातून ती चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. मागच्या काही दिवसांपासून राखी तिचा म्युझिक व्हिडीओ टतेरे ड्रीम में मेरी एंट्री'मुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या गाण्यातील तिच्या डान्स मूव्ह्सनी चाहत्यांना वेड लावलं आहे. अशात आता राखीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये राखी सावंत एका रिक्षा चालकाला थांबवून त्याला डान्स शिकवताना दिसत आहे. राखीचा हा धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओमध्ये राखी एका रिक्षा चालकाला तिच्या नव्या गाण्याच्या काही डान्स स्टेप शिकवताना दिसत आहे. राखीच्या या व्हिडीओवर युझर्स धम्माल कमेंट करतानाच तिचं कौतुकही करत आहेत. याशिवाय राखी सावंतचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात काही लहान मुलं तिला भेटायला आलेली दिसत आहे. मुलांना पाहिल्यानंतर राखी खूपच उत्साहित झालेली पाहायला मिळते. ती त्यांच्यासोबत गप्पा मारते एवढंच नाही तर त्यांच्यासोबत डान्सही करते. राखी सावंतचे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. चाहते तिच्या व्हिडीओचं कौतुक करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर चाहत्यांनी राखीला 'क्यूट' असंही म्हटलं आहे. राखी सावंतच्या म्युझिक व्हिडीओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं ती देखील खूप खुश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d6sSD1