Full Width(True/False)

Redmi चा हा स्मार्टफोन पुन्हा एकदा झाला महाग, पाहा नवी किंमत

नवी दिल्लीः Xiaomi ने Redmi Note 10 स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. या फोनच्या किंमतीत आधी मार्च महिन्यात वाढ करण्यात आली होती. कंपनीने आता गुपचूपपणे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या फोनच्या किंमतीत वाढ केली आहे. रेडमीने नोट १० च्या टॉप व्हेरियंटच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली आहे. यानंतर या फोनची नवीन किंमत १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. Redmi Note 10 च्या या व्हेरियंटची नवीन किंमत शाओमीच्या अधिकृत वेबसाइट Mi.com वर आधीच दिसत आहे. याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. या फोनच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. वाचाः याआधीही झाली होती वाढ Redmi Note 10 च्या या दोन्ही स्टोरेज व्हेरियंट मध्ये एप्रिल मध्ये ५०० रुपयांनी महाग करण्यात आले होते. यानंतर याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपयावरून १२ हजार ४९९ रुपये झाली होती. आता याप्रमाणे Redmi Note 10 च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांवरून १४ हजार ४९९ रुपये झाली आहे. वाचाः Redmi Note 10 चे फीचर्स रेडमीच्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७८ ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत येते. फोन मध्ये 2400x1080 पिक्सेल रिझॉल्यूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले सपोर्ट करते. या फोनमध्ये सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मागच्या बाजुला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 8MP, सेकेंडरी कॅमेरा 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल सेंसर, 2MP मायक्रो सेन्सर आणि 2MP डेप्थ कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. हा फोन Android 11 वर आधारित MIUI 12 काम करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gWyPnd