Full Width(True/False)

इतरांपासून WhatsApp चॅट लपवायचे आहे ? वापरा ही सोपी ट्रिक

नवी दिल्ली : इंस्टेंट मेसेजिंग अ‍ॅप व्हाट्सअ‍ॅपचा कोट्यावधी लोक वापर करतात. अनेक लोक चॅट कोणीही वाचू नये यासाठी व्हॉट्सअ‍ॅपला पासवर्ड ठेवतात. मात्र, अनेकदा हा पासवर्ड जवळच्या लोकांना माहिती असतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरीही चॅट लपवता येत नाही. मात्र, एका छोट्या ट्रिकद्वारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप चॅट लपवू शकता. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमधील archive हे फीचरचा देखील वापर केला जातो. मात्र या फीचरबद्दल आता अनेकांना माहिती आहे. या व्यतिरिक्त देखील एका सोप्या ट्रिकद्वारे तुम्ही चॅट लपवू शकता. वाचाः Archive न करता कसे लपवाल
  • यासाठी तुम्हाला अँड्राइड स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करावे लागेल. या अ‍ॅपचा वापर एकाच फोनमध्ये दोन वापरण्यासाठी देखील करू शकता.
  • अ‍ॅपला इंस्टॉल केल्यानंतर फोन नंबर व्हेरिफाय करून अकाउंट तयार करा.
  • आता तुम्ही यात साधारण व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच चॅट करू शकता. यात तुम्हाला चॅट Hide करण्याचा पर्याय मिळेल.
  • यासाठी कोणत्याही चॅटला लाँग प्रेस करा. यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्यावरती तीन डॉट दिसतील.
  • तीन डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Hide पर्याय दिसेल.
  • चॅट लॉक करण्यासाठी तुम्हाला पॅटर्न टाकावे लागेल.
  • पॅटर्न लॉक लावल्याने चॅट लपवण्यास मदत होईल व चॅट होम पेजवर दिसणार नाही. आता लपवलेले चॅट केवळ पासवर्डनेच उघडेल.
वाचाः लपवलेले चॅट कसे बघाल
  1. तुमच्या अँड्राइड स्मार्टफोनमध्ये GBWhatsApp उगडा.
  2. अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर डाव्या बाजूला उजव्या कोपऱ्यातील GBWhatsApp टेक्स्टवर क्लिक करा.
  3. येथे चॅट लपवताना टाकलेला पॅटर्न टाका.
  4. पॅटर्न टाकल्यानंतर तुम्हाला लपवलेले चॅट दिसेल. आता तुम्ही मेसेज वाचू शकता व रिप्लाय देऊ शकता.
वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35foPA2