Full Width(True/False)

WhatsApp :चुकीने डिलीट झालेले मेसेजेस 'असे' वाचा, पाहा सोपी ट्रिक

नवी दिल्ली. जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सच्या सोयीनुसार अनेक उपयुक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. चॅट्स करण्याशिवाय यात व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग सारखी विशेष वैशिष्ट्ये आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर अदृश्य होणारे मेसेज फीचर देण्यात आले आहे, ज्यात त्यावर पाठविलेले मेसेजेस डिलीट केले जातात. बर्‍याच वेळा आपल्याला काही विशिष्ट डिलीट केलेले मेसेजेस वाचण्याची आवश्यकता असते, अशात आपल्याला व्हॉट्स अ‍ॅपचे डिलीट केलेले मेसेज कसे वाचता येतील हे माहित असले तर मस्तच. डिलीट केलेले मेसेजेस पुन्हा वाचायचे असलतील तर या टिप्स नक्की कामी येतील. वाचा : व्हॉट्सअ‍ॅपवर एकदा डिलीट झालेला मेसेज वाचण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची आवश्यकता या थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशनचे नाव WhatsRemoved+असे आहे. फोनवर WhatsRemoved + अॅप डाउनलोड झाल्यानंतर, ते उघडा आणि अटी आणि शर्ती सहमती द्या. अ‍ॅपला काम करण्यासाठी आपल्याला फोनच्या सूचनांमध्ये प्रवेश द्यावा लागेल. आपण सहमत असल्यास, होय वर क्लिक करा. यानंतर, ज्यांचे मेसेजेस आपण सेव्ह करू इच्छिता अशा Apps ची निवड करा. आता फक्त व्हॉट्सअॅप मेसेज एनेबल करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा. फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे इतर पर्याय देखील उपलब्ध असतील. सेव्ह करू इच्छित असेलली फाईल निवडा. आता एक पेज उघडले जाईल. जेथे सर्व डिलीट झालेले मेसेजेस दिसतील. आपल्याला स्क्रीनच्या शीर्षस्थानी आढळलेल्या ऑप्शनजवळ व्हॉट्सअॅप पर्यायावर क्लिक करावे लागेल. या सेटिंग्ज एनेबल केल्यानंतर, तुम्ही डिलीट झालेले सर्व व्हॉट्सअॅप मेसेज वाचू शकता. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gPwuKE