Full Width(True/False)

स्वस्तात मस्त! ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत हे स्मार्टफोन्स, फीचर्स जबरदस्त

नवी दिल्लीः Cheap Smartphones: देशात आणि जगभरात स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढताना दिसत आहे. लागोपाठ कंपन्या बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन्स लाँच करीत आहे. देशात स्वस्त आणि चांगले स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच स्वस्तात मस्त स्मार्टफोन्सची माहिती सांगणार आहोत. या स्मार्टफोनची किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Xiaomi Redmi 9A रेडमीचा हा स्मार्टफोन स्वस्त किंमतीचा मोबाइल आहे. या फोनची किंमत फक्त ६ हजार ८०० रुपये आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः Poco C3 पोको कंपनी आपल्या स्वस्त आणि जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोनसाठी ओळखले जाते. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ५०० रुपये आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज दिले आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 13+2+2MP चा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः Realme C11 रियलमीच्या या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ५०० रुपये आहे. फीचर्स मध्ये हा स्मार्टफोन खूप चांगला आहे. Realme C11 मध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, 13+2MP चा रियर कॅमेरा सेटअप, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः Techno Spark 6 Air टेक्नोच्या या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ८०० रुपये आहे. हा फोन अडवॉन्स्ड टेक्नोलॉजीवर आधारित आहे. Spark 6 Air मध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये ७ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये 13+2MP कॅमेरा दिला आहे. ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35KWxh7