नवी दिल्ली : चे संस्थापक आज आपले पद सोडणार आहेत. बेझॉस यांच्या जागी कंपनीचे नवीन सीईओ असतील. अँडी जेस्सी हे ५ जुलैपासून सीईओ पदाचा कार्यभार सांभाळतील. जेफ बेझॉस पद सोडल्यानंतर देखील इतर कामं करत राहणार आहेत. वाचा: ५७ वर्षीय जेफ बेझॉसनंतर (AWS) चे सीईओ अँडी जेस्सी कंपनी सांभाळतील. जेस्सी हे कंपनीच्या क्लाउड सर्व्हिसचे काम २० वर्षांपासून पाहत आहेत. सीईओ पद सोडल्यानंतर देखील बेझॉस हे अॅमेझॉन बोर्डचे एग्झिक्यूटिव्ह चेअरमन कायम राहतील. सीईओ पद सोडल्यानंतर बेझॉस इतर कामांवर लक्ष देणार आहेत. याबाबत त्यांनी आधीच माहिती दिली होती. बेझॉस कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणार आहेत, पाहुयात. वाचा: बेझॉस अंतराळात जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. यासाठी त्यांनी Blue Origin कंपनीवर लाखो डॉलर्स खर्च केले आहेत. जेणेकरून अंतराळ पर्यटन आणि इंफ्रास्ट्रक्चर वाढवता येईल. ते New Shepard स्पेस कॅप्सूलद्वारे अंतराळात जाणार आहे. बेझॉस यांनीक काही दिवसांपूर्वीच Dwayne ‘The Rock’ Johnson सोबत एक सेल्फी शेअर केला होता. रिपोर्टनुसार, Amazon Studios आणि द रॉकच्या Seven Bucks Productions मध्ये चित्रपटांच्या निर्मितासाठी भागीदारी झाली आहे. Washington Post जेफ बेझॉस आता Washington Post वृत्तपत्रावर देखील लक्ष केंद्रीत करणार आहे. या वृत्तपत्राला त्यांनी २०१३ मध्ये २५० मिलियन डॉलरमध्ये खरेदी केले होते. या व्यतिरिक्त समाज उपयोगी कामं देखील ते करणार आहेत. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yppATO