नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी ने ७५ रुपये आणि ९४ रुपयांच्या आपल्या २ प्रीपेड मोबाइल प्लान व्हाऊचर्सला बंद केले आहे. कंपनीने या मोबाइल प्लान्सला ३ जुलै २०२१ पासून सर्व टेलिकॉम सर्कल्स मध्ये हे प्लान बंद केले आहेत. याशिवाय, बीएसएनएलने २ नवीन स्पेशल टॅरिफ व्हाऊचर्स (STV) आणले आहे. हे स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स ७५ रुपये आणि ९४ रुपयांपर्यंत आहे. वाचाः ७५ रुपयाचे स्पेशल टॅरिफ व्हाऊचर्समध्ये मिळणार हे फायदे बीएसएनएलच्या ७५ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरची वैधता ६० दिवसांची आहे. या स्पेशल टॅरिफ व्हाऊचरमध्ये युजर्संना २ जीबी फ्री डेटा मिळणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर १०० मिनिट फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच ६० दिवसांसाठी फ्री बीएसएनएल डिफॉल्ट ट्यून मिळते. फ्री कॉलिंग मिनिट संपल्यानंतर कॉल केल्यानंतर ३० पैसे प्रति मिनिट या प्रमाणे चार्ज द्यावा लागतो. वाचाः ९४ रुपयाचा स्पेशल टॅरिफ व्हाऊचर मध्ये मिळतील हे फायदे सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या ९४ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचरची वैधता ९० दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना ९० दिवसासाठी एकूण ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर कॉल करण्यासाठी फ्री १०० मिनिट मिळतात. याशिवाय, ६० दिवसांसाठी फ्री बीएसएनएल डिफॉल्ट ट्यून मिळेल. फ्री कॉलिंग मिनिट संपल्यानंतर कॉल करण्यासाठी ३० पैसे प्रति मिनिट याप्रमाणे चार्ज द्यावा लागेल. वाचाः याशिवाय, BSNL ने आपला एक जबरदस्त प्रीपेड प्लान वर प्रमोशनल एक्स्ट्रा वैधता ऑफर वाढवली आहे. बीएसएनएलची ही ऑफर ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. ही ऑफर २८ सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या ६९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानवर युजर्संना आता यावर्षी २८ सप्टेंबर पर्यंत १८० दिवसांची वैधता मिळणार आहे. हा प्लान १६० दिवसांच्या वैधतेसह येत होता. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UXd67h